FIL
FIL Filipino
M'Cheyne Bible Journey
Plano sa Pagbasa ng Bibliya — M'Cheyne Isang Taon
Sundin itong Bible Reading Plan sa apat na sipi sa isang araw—ang Lumang Tipan minsan at ang Bagong Tipan at Mga Awit dalawang beses sa isang taon.
KO Koreano
EN Ingles
CN Intsik
JP Hapon
PH mga wika sa Pilipinas
HI Hindi
BN Bengali
TA Tamil
TE Telugu
ML Malayalam
FA Persiyano
MY Burmese
NE Nepali
MR Marathi
KN Kannada
HA Hausa
YO Yoruba
SW Swahili
IG Igbo
ID Indones
PT Portuges
VI Biyetnames
AR Arabe
RU Ruso
UK Ukrainiano
RO Rumano
IT Italyano
FI Pinlandes
TO Tongan
HR Kroatyano
SR Serbiano
TR Turko
HU Unggaro
PL Polako
SK Eslobako
LA Latin
NL Olandes
CS Tseko
FR Pranses
ES Espanyol
DE Aleman
OT Iba pang mga wika
Pagkumpirma ng pagbabasa
Natapos mo ba itong M'Cheyne day?
Kumpirmahin ito upang markahan ang araw na ito na kumpleto sa iyong tsart ng pag-unlad ng M'Cheyne.
여호수아 2
Rahab Hides the Spies
1त्यानंतर नूनाचा पुत्र यहोशुआने गुप्तपणे शिट्टीम येथून दोन हेर पाठविले. तो म्हणाला, “जा, देशाचे अवलोकन करा, विशेषकरून यरीहोचे.” तेव्हा ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी गेले आणि तिथे राहिले.
2तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”
3तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबकडे निरोप पाठविला: “जे लोक तुझ्याकडे आले आणि तुझ्या घरी उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण ते संपूर्ण देशात हेरगिरी करण्यासाठी आले आहेत.”
4परंतु त्या स्त्रीने त्या दोन्ही पुरुषांना लपवून ठेवले होते. ती म्हणाली, “होय, ते पुरुष माझ्याकडे आले होते, परंतु मला माहीत नव्हते की ते कुठून आले होते.
5संध्याकाळी शहराच्या वेशी बंद होण्याच्या सुमारास ते निघून गेले. मला माहीत नाही ते कोणत्या मार्गाने गेले. लवकर त्यांच्यामागे जा. तुम्ही त्यांना पकडू शकाल.”
6परंतु तिने त्यांना घराच्या धाब्यावर वाळत ठेवलेल्या जवसाच्या ताटांच्या ढिगार्याखाली लपविले होते.
7तेव्हा ते पुरुष जो रस्ता यार्देन नदी ओलांडण्यासाठी जातो त्या रस्त्यावर हेरांचा शोध करीत गेले. शोध घेणारे बाहेर पडताच वेशी बंद करण्यात आल्या.
The Oath of Rahab and the Spies
8रात्री ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती घराच्या धाब्यावर गेली
9आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत.
10कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्या सीहोन व ओग या दोन अमोर्यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे.
11जेव्हा आम्ही या गोष्टी ऐकल्या, तेव्हा आमची अंतःकरणे भीतीने थरारून गेली आणि प्रत्येकाचे धैर्य थंड पडले, कारण याहवेह जे तुमचे परमेश्वर वर स्वर्गात आहेत ते परमेश्वर पृथ्वीवर सुद्धा आहेत.
12“तर आता मला याहवेहकडून वचन द्या की तुम्ही माझ्या कुटुंबावर दया दाखवाल, कारण मी तुमच्यावर दया दाखविली आहे. मला खात्रीने एक चिन्ह द्या,
13की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.”
14“आम्ही तुमच्या जिवास जीव देऊ!” त्या पुरुषांनी तिला खात्री दिली. “आम्ही जे काही करीत आहोत ते जर तू सांगणार नाहीस, तर जेव्हा याहवेह हा प्रदेश आमच्या हाती देतील, आम्ही तुला दयेने वागवू आणि तुझ्याबरोबर विश्वासू राहू.”
15तेव्हा तिने खिडकीतून दोरी टाकून त्यांना खाली उतरविले कारण तिचे घर गावकुसावर होते.
16ती त्यांना म्हणाली, “तुम्ही डोंगराकडे पळून जा म्हणजे तुमचा शोध घेणार्यांना तुम्ही सापडणार नाही. जोपर्यंत ते परत येत नाहीत, तोपर्यंत तीन दिवस तिथेच लपून राहा आणि नंतर तुम्ही तुमच्या मार्गाने परत जा.”
17आता ते पुरुष तिला म्हणाले, “जेव्हा आम्ही या प्रदेशात प्रवेश करू त्यावेळेस किरमिजी रंगाचा हा दोर, ज्याने तू आम्हाला खाली सोडलेस तो तुझ्या खिडकीतून लोंबताना आम्हाला दिसला नाही आणि तुझे वडील आणि आई, तुझे भाऊ आणि तुझ्या सर्व कुटुंबाला तुझ्या घरात आणले नाहीस तर, तू जे वचन आमच्याकडून शपथ घालून घेतले आहेस, ते आमच्यावर बंधनकारक राहणार नाही.
19जर त्यांच्यापैकी कोणीही घराबाहेर रस्त्यावर जातील तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर राहेल, आम्ही त्याला जबाबदार नसणार. जे तुझ्या घरात तुझ्याबरोबर आहेत जर त्यांना काही झाले तर त्यांचे रक्त आमच्या माथ्यावर असेल.
20परंतु जर तू आम्ही काय करीत आहोत हे कोणाला सांगितलेस तर, ही शपथ जी तू आमच्याकडून वाहून घेतली आहेस त्यातून आम्ही मुक्त होऊ.”
21“मला मान्य आहे,” ती म्हणाली. “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होवो.”
The Spies Return and Report
22जेव्हा ते डोंगराळ भागाकडे निघून गेले आणि तीन दिवस तिथे राहिले, तोपर्यंत शोध करणार्यांनी सर्व रस्त्यांवर त्यांचा शोध घेतला आणि काही न सापडता ते परत आले.
23नंतर ते दोन पुरुष परत मागे निघाले. डोंगर उतरले आणि नदी पार करून नूनाचा पुत्र यहोशुआकडे आले आणि त्यांच्या बाबतीत घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या.
24ते यहोशुआला म्हणाले, “याहवेहने तो संपूर्ण प्रदेश निश्चितच आपल्या हाती दिला आहे; तेथील सर्व लोक आपल्यामुळे भयभीत झालेले आहेत.”
시편 123, 124, 125
Eyes Lifted in Hope of Mercy
1मी माझी दृष्टी वर, तुमच्याकडे लावतो,
2जसा एखादा दास आपली दृष्टी आपल्या धन्याच्या हाताकडे लावतो,
3आम्हावर दया करा, हे याहवेह, आम्हावर दया करा,
4उन्मत्त लोकांचा घोर उपहास आम्ही सहन केला
Salvation like a Bird Escaped from the Snare
1सर्व इस्राएलने हे कबूल करावे की—
2जेव्हा मनुष्यांनी आमच्यावर आक्रमण केले होते,
3तर त्यांचा संताप आमच्यावर भडकला असता.
4जलप्रलयात आम्ही बुडून गेलो असतो
5उचंबळलेल्या लाटांनी आम्हाला
6याहवेह धन्यवादित असोत;
7पारध्याच्या पाशातून पक्षी निसटावा,
8आमच्या साहाय्याचा उगम,
The Lord Who Surrounds and Keeps like the Mountains
1ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत,
2यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात,
3नीतिमान लोकांना दिलेल्या वतनावर
4हे याहवेह, जे नीतिमान आहेत,
5परंतु जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात,
이사야 62
Zion's New Name and the Unceasing Watchmen
1सीयोनचा निर्दोषपणा सूर्योदयासारखा उजळून,
2राष्ट्रे तुझा निर्दोषपणा,
3तू याहवेहच्या हातातील गौरवशाली मुकुट,
4यापुढे तुला ते त्याग केलेली असे म्हणणार नाहीत,
5जसा एक तरुण एका तरुणीशी विवाह करतो,
6अगे यरुशलेमे, तुझ्या कोटांवर मी पहारेकरी नेमले आहेत;
7आणि ते यरुशलेमची पुन्हा स्थापना करेपर्यंत
8आपल्या उजव्या हाताने
9परंतु जे पीक काढतील, तेच ते खाईल
10बाहेर पडा! वेशींच्या बाहेर पडा!
11याहवेहनी पृथ्वीच्या
12त्यांना पवित्र लोक,
마태복음 10
Jesus Sends Out the Twelve Apostles
1येशूंनी आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलाविले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला.
2त्यांच्या बारा प्रेषितांची नावे ही:
3फिलिप्प आणि बर्थलमय;
4शिमोन कनानी आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने येशूंना विश्वासघाताने धरून दिले.
5येशूंनी बारा प्रेषितांना सूचना देऊन पाठविले: “गैरयहूदी लोकांकडे जाऊ नका किंवा शोमरोन्यांच्या कोणत्याही शहरात प्रवेश करू नका.
6इस्राएलांच्या हरवलेल्या मेंढराकडे जा.
7जात असताना, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे’ अशी घोषणा करा.
8आजार्यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या.
9“प्रवासाला जाताना कमरपट्ट्यात सोने, चांदी किंवा तांबे असे काहीही घेऊ नका.
10तुमच्या प्रवासासाठी थैली किंवा अधिक अंगरखा किंवा पायतण किंवा काठी घेऊ नका; कारण कामकरी अन्नास पात्र आहे.
11ज्या एखाद्या शहरात किंवा गावात तुम्ही प्रवेश कराल, त्यावेळी एखाद्या योग्य मनुष्याचा शोध करा आणि निघेपर्यंत त्याच्याच घरी राहा.
12एखाद्या घरात प्रवेश करताना शुभेच्छा द्या.
13ते घर योग्य असेल, तर तुमच्या आशीर्वादाप्रमाणे तिथे शांती नांदेल. पण याउलट परिस्थिती असली तर तुमचा आशीर्वाद तुम्हाकडे परत येईल.
14जर कोणी तुमचे स्वागत केले नाही किंवा तुमचे शब्द ऐकले नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून निघा आणि तुमच्या पायाची धूळ तिथेच झटकून टाका.
15मी तुम्हाला निश्चित सांगतो की, न्यायाचा दिवस सदोम व गमोराला त्या नगरापेक्षा अधिक सुसह्य असेल.
Coming Persecutions Foretold
16“मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरांसारखे निर्दोष असा.
17तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल.
18तुम्हाला माझ्या नावासाठी त्यांना व गैरयहूदीयांना साक्ष व्हावी म्हणून अधिकारी व राजांसमोर आणले जाईल.
19तुम्हाला अटक करून नेल्यावर न्यायालयासमोर काय बोलावे व कसे बोलावे याविषयी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला काय बोलावे ते सुचविले जाईल.
20कारण तुम्ही बोलणार नाही पण तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
21“भाऊ भावाला, पिता आपल्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील.
22माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहतील, त्याचे मात्र तारण होईल.
23तुमचा एका शहरात छळ होऊ लागला की दुसर्या शहरात पळून जा. कारण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, मानवपुत्र येण्याअगोदर इस्राएलाच्या नगरांमधून तुमचे फिरणे संपणारच नाही.
24“शिष्य गुरूपेक्षा थोर नाही, किंवा दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही.
25शिष्याने आपल्या गुरू सारखे असणे आणि दासाने आपल्या धन्यासारखे असणे पुरे आहे. जर घर प्रमुखाला बालजबूल म्हटले, तर घरच्या सभासदांना कितीतरी अधिक म्हणतील!
Fear Him Who Is to Be Feared
26“तुम्ही त्यांना भिऊ नका, जे प्रकट होणार नाही, असे काही झाकलेले नाही उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही.
27आता मी तुम्हाला अंधारात सांगत आहे, ते दिवसाच्या प्रकाशात सांगा; जे मी तुमच्या कानात सांगत आहे, ते घराच्या धाब्यावरून जाहीर करा.
28जे तुमच्या शरीराचा वध करू शकतात, परंतु आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, अशांना भिऊ नका. तर तुमचा आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकामध्ये जे नाश करू शकतात, त्या परमेश्वराचे मात्र भय धरा.
29दोन चिमण्या एका पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणी तुमच्या पित्याच्या इच्छेविना जमिनीवर पडणार नाही.
30आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत.
31म्हणून भीती बाळगू नका, कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.
32“जो कोणी मला इतरांपुढे जाहीरपणे स्वीकारेल, तर मीही त्याचा माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे स्वीकार करेन.
33जे मला लोकांसमोर नाकारतात, मीही त्यांना माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे नाकारेन.
Not Peace, but a Sword
34“मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे, अशी कल्पना करू नका. शांती देण्यासाठी नाही, तर तलवार चालविण्यास आलो आहे.
35“ ‘मनुष्य आपल्या पित्याविरुद्ध,
36मनुष्याचे शत्रू त्याच्या आपल्याच कुटुंबातील सदस्य असतील.’
37“जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आईवडीलांवर अधिक प्रेम करीत असेल, तर तो मला पात्र नाही; जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या पुत्र व कन्यांवर अधिक प्रेम करीत असेल, तर ते मला पात्र नाही.
38जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो मला पात्र नाही.
39कारण जो कोणी आपला जीव मिळवितो तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल.
Rewards for Receiving a Disciple
40“जे तुमचे स्वागत करतात, ते माझे स्वागत करतात, आणि जे माझे स्वागत करतात, ते ज्यांनी मला पाठविले त्यांचे स्वागत करतात.
41जो संदेष्ट्यांचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो, त्याला संदेष्ट्यांचे प्रतिफळ मिळेल; जो कोणी नीतिमान व्यक्तीचा नीतिमान म्हणून स्वीकार करतो, त्याला नीतिमान व्यक्तीचे प्रतिफळ मिळेल.
42मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या लहानातील एकाला, जो माझा शिष्य आहे, त्याला पेलाभर थंड पाणी प्यावयास दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.”