繁
KO 韓語
EN 英語
CN 中文
JP 日語
PH 菲律賓語系
HI 印地語
BN 孟加拉語
TA 坦米爾語
TE 泰盧固語
ML 馬拉雅拉姆語
FA 波斯語
MY 緬甸語
NE 尼泊爾語
MR 馬拉地語
KN 坎那達語
HA 豪薩語
YO 約魯巴語
SW 斯瓦希里語
IG 伊博語
ID 印尼語
PT 葡萄牙語
VI 越南語
AR 阿拉伯語
RU 俄語
UK 烏克蘭語
RO 羅馬尼亞語
IT 義大利語
FI 芬蘭語
TO 東加語
HR 克羅埃西亞語
SR 塞爾維亞語
TR 土耳其語
HU 匈牙利語
PL 波蘭語
SK 斯洛伐克語
LA 拉丁語
NL 荷蘭語
CS 捷克語
FR 法語
ES 西班牙語
DE 德語
OT 其他語言
讀經確認
你完成了這一天的麥琴讀經嗎?
點選確認後,會在我的頁面麥琴進度表中記錄為已完成。
역대하 36
The Reigns of Jehoahaz and Jehoiakim
1आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजला यरुशलेमात त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले.
2वयाच्या तेवीसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले.
3इजिप्तच्या राजाने त्याला यरुशलेममध्ये राज्यपदावरून खाली पाडले आणि यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला.
4इजिप्तच्या राजाने यहोआहाजचा भाऊ एल्याकीम याला यहूदीया आणि यरुशलेमचा राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु नखोने एल्याकीमचा भाऊ यहोआहाजाला घेऊन इजिप्तमध्ये नेले.
5वयाच्या पंचवीसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याने याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
6बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला बाबेलला घेऊन जाण्यासाठी त्याला कास्याच्या साखळदंडाने बांधले.
7नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील वस्तूसुद्धा बाबेलमध्ये नेल्या आणि त्या तिथे त्याच्या मंदिरात ठेवल्या.
8यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने केलेल्या घृणास्पद गोष्टी आणि त्याच्याविरुद्ध जे काही होते, ते सर्व इस्राएली आणि यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.
The Reigns of Jehoiachin and Zedekiah
9वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात तीन महिने दहा दिवस राज्य केले. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले.
10वसंतऋतूमध्ये राजा नबुखद्नेस्सरने त्याला बोलाविणे पाठवले आणि त्याला बाबेलमध्ये आणले, त्याचबरोबर याहवेहच्या मंदिरातील मौल्यवान वस्तू आणल्या आणि त्याने यहोयाखीनचा काका सिद्कीयाहला यहूदीया आणि यरुशलेमवर राजा केले.
11सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले.
12त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांच्या दृष्टीने जे वाईट ते केले आणि यिर्मयाह संदेष्टाने याहवेहचे वचन त्याला सांगितले, तरी त्यांच्यासमोर तो नम्र झाला नाही.
13ज्याने त्याला परमेश्वराच्या नावाने शपथ घ्यायला लावली होती, त्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरविरुद्धही त्याने बंड केले. तो ताठ मानेचा झाला आणि त्याने त्याचे हृदय कठोर केले आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्याकडे तो वळला नाही.
14याव्यतिरिक्त याजकांचे सर्व पुढारी आणि लोक अधिकच अविश्वासू झाले, त्यांनी इतर राष्ट्रांच्या सर्व घृणास्पद प्रथांचे पालन केले आणि यरुशलेममध्ये पवित्र केलेले याहवेह यांचे मंदिर त्यांनी अशुद्ध केले.
15याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वरानी त्यांच्या संदेष्ट्यांच्याद्वारे त्यांना वारंवार संदेश पाठवले, कारण त्यांनी त्यांच्या लोकांवर आणि त्यांच्या निवासस्थानावर दया केली होती.
16परंतु त्यांनी तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईपर्यंत परमेश्वराच्या संदेष्ट्यांची चेष्टा केली, याहवेहचा राग त्यांच्या लोकांविरुद्ध चेतवेपर्यंत त्यांच्या शब्दांचा तिरस्कार केला आणि त्यांच्या संदेष्ट्यांची थट्टा केली.
The Fall of Jerusalem and the Babylonian Exile
17याहवेहनी खाल्डियन लोकांच्या राजाला त्यांच्याविरुद्ध आणले, ज्यांनी त्यांच्या तरुण पुरुषांना मंदिरात तलवारीने मारले आणि तरुण पुरुष किंवा तरुण स्त्रिया, वृद्ध किंवा जे अशक्त होते त्यांनाही सोडले नाही. परमेश्वराने त्या सर्वांना नबुखद्नेस्सरच्या हाती दिले.
18ज्याने परमेश्वराच्या मंदिरातील मोठ्या आणि लहान सर्व मौल्यवान वस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील खजिने आणि राजा आणि त्याचे अधिकारी, यांचे खजिने बाबेलला नेले.
19त्यांनी परमेश्वराच्या मंदिराला आग लावली आणि यरुशलेमचे तट पाडून टाकले; त्यांनी सर्व राजवाडे जाळले आणि तेथील सर्व मौल्यवान वस्तूंचा नाश केला.
20तलवारीच्या घातापासून सुटलेल्या लोकांना तो बाबेलला बंदिवासात घेऊन गेला आणि पर्शियाचे राज्य सत्तेवर येईपर्यंत ते त्याचे आणि त्याच्यानंतर येणाऱ्यांचे सेवक झाले.
21भूमीने शब्बाथाच्या विश्रांतीचा आनंद घेतला; यिर्मयाहने सांगितलेल्या याहवेहच्या वचनाच्या पूर्णतेची सत्तर वर्षे होईपर्यंत त्या भूमीने तिच्या उजाडपणाच्या सर्व वेळेत विसावा घेतला.
The Decree of Cyrus for the Return
22यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली.
23“पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की:
요한계시록 22
The River of the Water of Life and the Tree of Life
1मग देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखविली. तिचे पाणी स्फटिकासारखे नितळ होते. परमेश्वर आणि कोकरा यांच्या राजासनांतून ती निघाली होती.
2राजमार्गाच्या मध्यावरून ती वाहत होती. नदीच्या दोन्ही बाजूंना जीवनदायी वृक्ष उभे होते, त्यांना वर्षातून बारा वेळा बहर येई. प्रत्येक महिन्याला त्यांना नवी फळे येत. त्यांची पाने राष्ट्रांना निरोगी करण्यासाठी औषध म्हणून वापरली जात.
3तिथे कोणतेही शाप असणार नाही, कारण परमेश्वराचे व कोकर्याचे सिंहासन त्या शहरात असेल आणि त्यांचे सेवक त्यांची सेवा करतील.
4ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल.
5तिथे रात्र असणार नाही, दिव्यांची किंवा सूर्यप्रकाशाची तिथे गरज पडणार नाही, कारण प्रत्यक्ष प्रभू परमेश्वरच त्यांचा प्रकाश होतील आणि ते युगानुयुग राज्य करतील.
The Promise of Coming Soon and the Warning
6नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना अंतःस्फूर्ती देणाऱ्या प्रभू परमेश्वरांनी ज्यागोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्यांच्या सेवकांना कळविण्यासाठी त्यांच्या दूताला पाठविले आहे.”
7“पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचनाचे पालन करतो तो धन्य.”
8मी, योहानाने या सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्या आणि ज्या देवदूताने मला त्या दाखविल्या, त्याला नमन करण्यासाठी मी त्याच्या पायांवर उपडा पडलो.
9परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. तू परमेश्वराची आराधना कर.”
10नंतर त्याने मला सांगितले, “या पुस्तकातील भविष्यकथनाचे शब्द शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे.
11अनाचारी अधिक अनाचार करोत, दुष्ट अधिक दुष्ट बनोत, न्यायी लोक अधिक नीतिमान होवोत व जे पवित्र आहेत, ते पवित्रतेत अधिकाधिक दृढ होवोत.”
12“पाहा, मी लवकर येत आहे! माझे प्रतिफळ मी बरोबर घेऊन येत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार देईन.
13मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदि व अंत आहे.
14“आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य.
15नगराच्या बाहेर कुत्रे व जादूटोणा करणारे, जारकर्मी, खुनी, मूर्तिपूजक, ज्यांना लबाडी प्रिय आहे असे लबाडी करणारे सर्वजण राहतील.
The Final Testimony and the Plea for the Lord
16“तू हे सर्व मंडळ्यांना सांगावे म्हणून मी येशूने, माझा दूत तुझ्याकडे साक्षीदार म्हणून पाठविला आहे. मी दावीदाचे मूळ व त्याचा वंश आहे. मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”
17आत्मा व वधू म्हणतात “ये!” हा शब्द ऐकणारा प्रत्येकजण म्हणो, “ये!” कोणाही तान्हेल्याने यावे आणि कोणतेही मोल न देता जीवनाचे पाणी हवे तेवढे प्यावे.
18या पुस्तकातील संदेश ऐकणार्या प्रत्येकाला मी सावध करतो: या ग्रंथपटात जे लिहिले आहे त्यात कोणी भर घातली, तर परमेश्वर त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा आणेल.
19तसेच जो कोणी या भविष्यकथनच्या पुस्तकात वर्णन केलेल्या वचनांतून काही काढून टाकील, परमेश्वर त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून काढून टाकील.
20ज्यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत, ते जाहीरपणे म्हणतात, “होय, मी लवकर येत आहे!”
21आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराच्या लोकांवर असो. आमेन.
말라기 4
The Day of the Lord and the Sun of Righteousness
1सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “निश्चितच तो दिवस येत आहे, जो धगधगत्या भट्टीसारखा ज्वलंत असेल. त्या भट्टीत गर्विष्ठ आणि दुष्ट लोक गवताच्या काडीप्रमाणे जळून जातील. तो दिवस येत आहे, जो त्यांना अग्नीत भस्मसात करेल. त्यांचे एकही मूळ अथवा फांदी त्यावर उरणार नाही.
2परंतु तुम्ही जे माझे नाव सन्माननीय मानता, त्या तुम्हासाठी नीतिमत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या किरणात आरोग्य असेल. मग तुम्ही बाहेर जाल व धष्टपुष्ट वासरांप्रमाणे बागडाल.
3जेव्हा मी कार्य करेन, त्या दिवशी तुम्ही दुष्ट लोकांना तुडवाल, ते तुमच्या पायाखालच्या राखेप्रमाणे होतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
I Will Send Elijah
4“होरेब पर्वतावर माझा सेवक मोशेमार्फत सर्व इस्राएली लोकांसाठी मी जे नियमशास्त्र दिले त्याची आठवण ठेवा.
5“पाहा! याहवेहचा तो महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी, मी तुमच्याकडे संदेष्टा एलीयाहला पाठवेन.
6तो पालकांचे अंतःकरण त्यांच्या मुलांकडे व मुलांचे अंतःकरण त्यांच्या पालकांकडे करेल; अन्यथा मी फटकारून त्यांच्या देशाचा संपूर्ण नाश करेन.”
요한복음 21
Jesus Appears at the Sea of Tiberias
1त्यानंतर येशू पुन्हा तिबिर्यास सरोवराजवळ शिष्यांस प्रगट झाले, ते असे घडले:
2शिमोन पेत्र, दिदुम म्हणून ओळखला जाणारा थोमा, गालीलातील काना येथील नाथानाएल, जब्दीचे पुत्र आणि दुसरे दोन शिष्य एकत्रित होते.
3शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयास बाहेर जात आहे,” तेव्हा ते पेत्राला म्हणाले, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते बाहेर निघून होडीत बसले, परंतु त्या रात्री ते काहीही धरू शकले नाही.
4पहाटेच्या वेळी, येशू सरोवराच्या काठावर उभे होते, परंतु ते येशू आहेत हे शिष्यांना समजले नाही.
5येशूंनी हाक मारून विचारले, “मित्रांनो, तुमच्याजवळ काही मासे आहेत काय?”
6मग त्यांनी म्हटले, “होडीच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला काही सापडतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा इतक्या मोठ्या संख्येने मासे मिळाले की त्यांना जाळे ओढणे अशक्य झाले.
7मग ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “ते प्रभू आहेत!” शिमोन पेत्राने, “ते प्रभू आहेत,” हे ऐकताच आपला अंगरखा कंबरेभोवती गुंडाळला, कारण त्याने तो काढून ठेवला होता आणि पाण्यात उडी मारली.
8दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले, कारण ते काठापासून दूर नव्हते, तर सुमारे नव्वद मीटर अंतरावर होते.
9मग काठावर उतरल्यावर, त्यांनी कोळशाचा विस्तव पाहिला, त्यावर मासळी व काही भाकरी ठेवल्या होत्या.
10येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीतून काही आणा.”
11शिमोन पेत्राने परत मचव्यावर चढून जाळे काठावर ओढून आणले. त्याने मोजल्याप्रमाणे त्यात एकशे त्रेपन्न मोठे मासे होते आणि इतके असूनही ते जाळे फाटले नव्हते.
12येशू त्यांना म्हणाले, “या आणि न्याहरी करा.” आपण कोण आहात? असे विचारण्याचे त्यांच्या शिष्यांपैकी एकालाही धैर्य झाले नाही, परंतु ते प्रभू आहे हे त्यांना माहीत होते.
13मग येशू आले, त्यांनी भाकर घेऊन त्यांना दिली व मासळीचेही त्यांनी तसेच केले.
14मेलेल्यातून उठल्यावर शिष्यांना प्रगट होण्याची येशूंची ही तिसरी वेळ होती.
Jesus Restores Peter
15जेवल्यानंतर येशू शिमोन पेत्राला म्हणाले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, या सर्वांपेक्षा तू मजवर अधिक प्रीती करतोस काय?”
16येशूंनी पुन्हा विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू मजवर प्रीती करतोस काय?”
17तिसर्या वेळेला त्यांनी त्याला विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?”
18मी तुला निश्चित सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा पोशाख चढवून तुला हवे तिथे जात होतास; परंतु तू जेव्हा वृद्ध होशील, तेव्हा तू आपले हात पसरशील आणि मग दुसरे तुला पोशाख घालतील आणि तुला जिथे जावयास नको तिथे नेतील.”
19परमेश्वराचे गौरव करण्यासाठी पेत्र कोणत्या प्रकारच्या मरणाने मरेल, हे त्याला कळावे, म्हणून येशू असे बोलले. मग येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये!”
20मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो त्यांच्यामागे येत होता असे त्याने पाहिले. भोजनाच्या वेळी येशूंच्या उराशी असता मागे वळून, “प्रभूजी, आपला घात कोण करणार आहे?” असे ज्याने विचारले होते तो हा शिष्य होता.
21पेत्राने त्याला पाहिल्यावर येशूंना विचारले, “प्रभूजी, याचे काय?”
22त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी पुन्हा येईपर्यंत त्याने जगावे, अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय? तुला माझ्यामागे आलेच पाहिजे.”
23या कारणाने, तो शिष्य मरणार नाही अशी अफवा विश्वासणार्यांमध्ये पसरली. परंतु तो मरणार नाही, असे ते म्हणाले नव्हते; येशू ख्रिस्त एवढेच म्हणाले होते, “मी येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असली, तर त्याचे तुला काय?”
24तो हा शिष्य ज्याने या सर्व गोष्टींविषयी साक्ष दिली आणि त्या लिहून ठेवल्या. त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे.
25येशूंनी दुसरीही बहुत कृत्ये केलीत. मला वाटते, जर सर्व घटना लिहून काढल्या, तर इतकी पुस्तके होतील की ती या संपूर्ण जगात मावणार नाहीत.