तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “आता मी फारोहला काय करतो, ते तू पाहशील: कारण माझ्या पराक्रमी हातामुळे तो लोकांना जाऊ देईल; कारण माझ्या बलवान हातामुळे तो त्यांना आपल्या देशाबाहेर घालवून देईल.”
EN
Copywork
Marathi OMRCV Exodus 6장
Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
Practice by section · Exodus
परमेश्वर मोशेला म्हणाले, मी याहवेह आहे.
मी सर्वसमर्थ परमेश्वर म्हणून अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रकट झालो होतो, परंतु माझ्या याहवेह या नावाने मी स्वतःची त्यांना ओळख करून दिली नव्हती.
ज्या कनान देशात ते पूर्वी परदेशी म्हणून राहत होते, तो देश मी त्यांना देईन, असा मी त्यांच्याशी करार स्थापित केला.
आता इस्राएली लोकांचे इजिप्तच्या दास्यातील विव्हळणे मी ऐकले आणि माझ्या कराराची मला आठवण झाली आहे.
म्हणून इस्राएली लोकांना सांग, “मी याहवेह आहे आणि मी तुम्हाला इजिप्तच्या लोकांच्या ओझ्याखालून बाहेर आणेन, त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतून मी तुम्हाला मुक्त करेन आणि माझ्या लांब केलेल्या बाहूने व न्यायाच्या महान कृत्यांनी तुमची सुटका करेन.
मी तुम्हाला माझे लोक म्हणून स्वीकारेन आणि मी तुमचा परमेश्वर होईन, मग तुम्हाला कळून येईल की, तुम्हाला इजिप्तच्या ओझ्याखालून सोडविणारा परमेश्वर याहवेह मीच आहे.
आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब यांना देण्यास मी हात उंच करून शपथ वाहिली, त्यात मी तुम्हाला आणेन आणि तो तुम्हाला वतन म्हणून देईन. मीच याहवेह आहे.”
तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएली लोकांना सांगितले, परंतु त्यांची निराशा व कठोर परिश्रम यामुळे त्यांनी त्याचे ऐकले नाही.
तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले,
“जा, इजिप्तचा राजा फारोह याला सांग की, इस्राएल लोकांस त्याच्या देशातून त्याने जाऊ द्यावे.”
परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “मी बोबड्या ओठांचा आहे म्हणून जर इस्राएल लोकच माझे ऐकत नाहीत, तर फारोह माझे का ऐकेल?”
आता याहवेह मोशे व अहरोनाशी इस्राएली लोक व इजिप्तचा राजा फारोह याविषयी बोलले आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे याविषयी आज्ञा केली.
त्यांच्या कुटुंब प्रमुखांची नावे ही:
शिमओनाचे पुत्र हे:
लेवीच्या पुत्रांची ही क्रमानुसार नावे:
गेर्षोनाच्या पुत्रांची त्यांच्या कुळांनुसार नावे ही:
कोहाथाच्या पुत्रांची नावे:
मरारीच्या पुत्रांची नावे:
अम्रामाने आपल्या वडिलांची बहीण योखबेद हिच्याबरोबर विवाह केला आणि तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे हे झाले.
इसहाराच्या पुत्रांची नावे:
उज्जीएलाच्या पुत्रांची नावे:
अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले.
कोरहाच्या पुत्रांची नावे:
अहरोनाचा पुत्र एलअज़ार याने पुटिएलाच्या कन्यांपैकी एकीबरोबर विवाह केला, आणि तिच्यापासून त्याला फिनहास झाला.
ज्या अहरोन व मोशे यांना याहवेहने सांगितले होते, “इजिप्तच्या भूमीतून सर्व इस्राएलच्या लोकांना त्यांच्या तुकडीनुसार बाहेर आणा.”
हे तेच मोशे व अहरोन आहेत जे इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासंबंधी इजिप्तचा राजा फारोहबरोबर बोलले.
जेव्हा मोशे इजिप्तमध्ये होता तेव्हा याहवेह त्याच्याशी बोलले,
याहवेह मोशेला म्हणाले, “मी याहवेह आहे. जा व मी तुला जे काही सांगतो ते इजिप्तचा राजा फारोह याला सांग.”
परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “कारण मी बोबड्या ओठांचा आहे, फारोह माझे कसे ऐकणार?”