याहवेह मोशेला म्हणाले,
EN
Copywork
Marathi OMRCV Leviticus 17장
Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
Practice by section · Leviticus
“अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांसाठी याहवेहने ज्या आज्ञा दिल्या त्या या आहेत:
इस्राएलाच्या घराण्यातील कोणत्याही मनुष्याने बैल, कोकरू किंवा शेळी यांचा छावणीत किंवा छावणीबाहेर वध केला,
परंतु याहवेहच्या निवासमंडपासमोर आणि तो प्राणी सभामंडपाच्या दाराशी याहवेहला अर्पण करण्याकरिता आणला नाही, तर त्या मनुष्याला रक्तपाताचा दोष लागेल; त्याने रक्त सांडले आहे, म्हणून त्याला आपल्या लोकातून बहिष्कृत करावे.
या आज्ञेचा उद्देश असा आहे की, इस्राएली लोक जे उघड्या मैदानात यज्ञपशू मारीत होते, ते त्यांनी सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे याहवेहपुढे आणावे आणि शांत्यर्पणाचे यज्ञ म्हणून याहवेहला अर्पण करावे.
याजकाने सभामंडपाच्या दाराशी असलेल्या याहवेहच्या वेदीवर रक्त शिंपडून याहवेहला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.
यापुढे ज्यांच्याबरोबर ते स्वतःच व्यभिचार करतात, त्या बोकडाच्या मूर्तींना , त्यांचे कोणतेही अर्पण करू नये. हा नियम त्यांच्यासाठी आणि येणार्या पिढ्यांसाठी लागू आहे.”
तू त्यांना सांग: इस्राएली किंवा तुमच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी यांनी होमार्पण किंवा यज्ञार्पण केले,
आणि याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी तो प्राणी अर्पण करण्यास आणला नाही, तर त्याला आपल्या लोकांमधून बहिष्कृत करावे.
इस्राएलांच्या घराण्यातील कोणीही किंवा त्यांच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी, जो रक्त खातो त्या माणसाविरुद्ध मी माझे मुख फिरवेन आणि मी त्यांना लोकांमधून बहिष्कृत करेन.
कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या प्रायश्चित्तासाठी मी तुम्हाला वेदीवर शिंपडण्यासाठी ते दिले आहे; रक्तात जीवन असल्यामुळे प्रायश्चित्त होते.
म्हणून मी इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुमच्यामधील कोणीही किंवा तुमच्यामध्ये राहणारा विदेशी यापैकी कोणीही रक्ताचे सेवन करू नये.”
“ ‘इस्राएली किंवा तुमच्यामध्ये असलेला कोणीही विदेशी शिकारीला गेला असता, त्याने खाण्यास योग्य असलेला पशू किंवा पक्षी यांची शिकार केली, तर त्याचे रक्त जमिनीवरच ओतून मातीने झाकून टाकावे,
कारण रक्त हे प्रत्येक प्राण्याचे जीवन आहे. म्हणून इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुम्ही कोणत्याही प्राण्याचे रक्त खाऊ नका, कारण प्रत्येक प्राण्याचे जीवन हे त्याचे रक्त आहे; जो कोणी रक्ताचे सेवन करेल त्याला बहिष्कृत केलेच पाहिजे.”
“ ‘जर कोणत्या व्यक्तीने, मग तो देशात जन्मलेला किंवा विदेशी असो, यापैकी जो कोणी मेलेल्या किंवा जंगली जनावराने फाडलेल्या मृत प्राण्याचे मांस खाईल, त्याने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने स्नान करावे आणि तो संध्याकाळपर्यंत विधिनियमानुसार अशुद्ध राहील आणि त्यानंतर तो शुद्ध होईल.
पण जर त्याने आपली वस्त्रे धुतली नाहीत व स्नान केले नाही, तर तो दोषीच राहील.’ ”