KO
KO 한국어
EN 영어
CN 중국어
JP 일본어
PH 필리핀어권
HI 힌디어
BN 벵골어
TA 타밀어
TE 텔루구어
ML 말라얄람어
FA 페르시아어
MY 버마어
NE 네팔어
MR 마라티어
KN 칸나다어
HA 하우사어
YO 요루바어
SW 스와힐리어
IG 이그보어
ID 인도네시아어
PT 포르투갈어
VI 베트남어
AR 아랍어
RU 러시아어
UK 우크라이나어
RO 루마니아어
IT 이탈리아어
FI 핀란드어
TO 통가어
HR 크로아티아어
SR 세르비아어
TR 튀르키예어
HU 헝가리어
PL 폴란드어
SK 슬로바키아어
LA 라틴어
NL 네덜란드어
CS 체코어
FR 프랑스어
ES 스페인어
DE 독일어
OT 기타 언어
통독 확인
이 일차의 맥체인 본문을 완료했나요?
확인 버튼을 누르면 마이페이지 맥체인 진도표에 완료로 기록됩니다.
사무엘하 22
David's Song of Thanksgiving
1जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या हातातून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले.
2तो म्हणाला:
3माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो,
4“स्तुतीस योग्य याहवेहचा, मी धावा केला,
5मृत्यूच्या लाटांनी मला घेरले;
6मृतलोकाच्या दोर्यांनी मला सभोवती घेरले;
7“मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला;
8तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली,
9त्यांच्या नाकपुड्यातून धूर निघाला;
10आकाशाला विभागून याहवेह खाली आले;
11करुबावर आरूढ होऊन ते उडून गेले;
12अंधकार, व आकाशातील काळे मेघ;
13त्यांच्या तेजस्वी समक्षतेतून
14याहवेहने स्वर्गातून गर्जना केली;
15त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली,
16याहवेहच्या धमकीने
17“वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले;
18माझ्या बलवान शत्रूपासून
19माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले,
20त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले;
21“याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार माझ्याशी व्यवहार केला आहे;
22कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत;
23त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत;
24मी त्यांच्यापुढे निर्दोष आहे
25याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार,
26“विश्वासणाऱ्यांशी तुम्ही विश्वासू आहात,
27शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता,
28नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता,
29हे याहवेह, तुम्ही माझे दीप आहात;
30तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो ;
31“परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे.
32याहवेहखेरीज दुसरा कोण परमेश्वर आहे?
33परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात ,
34तेच माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतात;
35ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात;
36माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे;
37माझी पावले घसरू नयेत,
38“मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि त्यांचा नाश केला;
39मी त्यांना पूर्णपणे तुडविले आणि ते उठू शकले नाही;
40तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले;
41तुम्ही माझ्या वैर्यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले,
42त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते;
43पृथ्वीच्या धुळीप्रमाणे मी त्यांचा भुगा केला;
44“लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली;
45परदेशी माझ्यासमोर भीतीने वाकतात;
46त्या सर्वांचे धैर्य खचून गेले,
47“याहवेह जिवंत आहे! माझ्या खडकाची स्तुती असो!
48परमेश्वरच आहेत, जे माझ्यासाठी सूड घेतात,
49ते मला माझ्या वैर्यांपासून मुक्त करतात.
50म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन;
51“ते आपल्या राजाला महान विजय देतात;
갈라디아서 2
The Gospel to the Gentiles Affirmed by the Apostles
1नंतर चौदा वर्षानंतर मी पुन्हा यरुशलेम येथे गेलो, यावेळेस बर्णबास माझ्याबरोबर होता. मी तीतालाही आमच्याबरोबर घेतले.
2मला प्राप्त झालेल्या प्रकटीकरणाचा प्रतिसाद म्हणून मी तिथे गेलो आणि तेथील प्रतिष्ठित पुढार्यांची एकांतात भेट घेऊन त्यांना ती शुभवार्ता सांगितली, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी गैरयहूदीयांमध्ये करीत आहे. मला खात्री करून घ्यायची होती की, मी व्यर्थ धावत नव्हतो आणि माझी धडपड मी काही व्यर्थपणे करीत आलेलो नव्हतो.
3माझ्याबरोबर असलेला तीतस ग्रीक होता, तरी त्याची सुंता झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला नाही.
4हा प्रश्न खोट्या विश्वासणार्यांमुळेच उद्भवला कारण ख्रिस्त येशूंमध्ये आम्हाला जे स्वातंत्र्य आहे, त्याचा शोध घेण्यासाठी आणि आम्हाला गुलाम बनविण्यासाठी काही खोटे विश्वासणारे आमच्यामध्ये घुसले होते.
5आम्ही एक क्षणभर देखील त्यांना वश झालो नाही, यासाठी की शुभवार्तेचे सत्य तुमच्याजवळ कायम असावे.
6ज्यांना अतिश्रेष्ठ म्हणून मानले जात होते ते काहीही करीत होते तरी मला काही फरक पडला नाही; परमेश्वर पक्षपात करीत नाही. त्यांनी माझ्या संदेशात काहीही भर घातली नाही.
7याउलट, त्यांनी ओळखले की सुंता न झालेल्या लोकांमध्ये शुभवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य मला सोपविण्यात आले आहे, ज्याप्रकारे पेत्राला सुंता झालेल्या लोकांमध्ये कार्य करण्याचे सोपविण्यात आले होते.
8कारण जे परमेश्वर सुंता झालेल्यांसाठी प्रेषित पेत्रामध्ये करीत होते, तेच परमेश्वर गैरयहूदीयांसाठी मी जो प्रेषित आहे त्या माझ्यामध्ये सुद्धा करीत होते.
9जेव्हा याकोब, केफा आणि योहान असे जे श्रेष्ठ आधारस्तंभ यांना समजले की मला कृपा प्राप्त झाली आहे, तेव्हा त्यांनी माझ्याशी व बर्णबाशी सहभागितेच्या उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. त्यांनी हे मान्य केले की आम्ही गैरयहूदीयांकडे जावे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.
10त्या सर्वांनी एकच अशी विनंती केली होती की गरिबांना साहाय्य करण्याची आम्ही सतत आठवण ठेवावी आणि तीच गोष्ट करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक होतो.
Paul Rebukes Peter at Antioch
11जेव्हा केफा अंत्युखिया येथे आला, तेव्हा मी त्याच्या तोंडावर त्याला विरोध केला, कारण तो दोषी होता.
12याकोबाकडून काही लोक येण्यापूर्वी तो प्रथम गैरयहूदी लोकांबरोबर भोजन करीत असे. परंतु जेव्हा ते आले, तेव्हा त्याने मागे सरकण्यास सुरुवात केली आणि तो स्वतःला गैरयहूदीयांपासून वेगळे करू लागला, कारण सुंता झालेल्या गटातील लोकांचे त्याला भय वाटत होते.
13बाकीचे यहूदी त्याच्या ढोंगात त्याला सामील झाले, म्हणून त्यांच्या ढोंगीपणामुळे बर्णबासचीसुद्धा चुकीची कल्पना झाली.
14जेव्हा मी पाहिले की, शुभवार्तेत जे सत्य आहे त्याप्रमाणे ते चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हणालो, “तू यहूदी आहेस तरी तू गैरयहूदीयांसारखे जगत आहेस आणि यहूदीयांसारखे नाही. तर मग हे कसे आहे की, गैरयहूदी लोकांना यहूदी प्रथा पाळण्यासाठी तू भाग पाडतोस?
Justified by Faith
15“जे आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि गैरयहूदी लोकांसारखे पापी नाही.
16हे जाणून घ्या, नियमशास्त्राच्या कार्याद्वारे मनुष्य नीतिमान ठरत नाही, परंतु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच आपण नीतिमान ठरतो. म्हणून आम्हीसुद्धा ख्रिस्त येशूंवर विश्वास ठेवला आहे, यासाठी की आम्हीसुद्धा ख्रिस्तामधील विश्वासाने नीतिमान ठरावे आणि नियमशास्त्र पाळल्याने नव्हे. कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने कोणी नीतिमान ठरत नाही.
17“ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरावे असा प्रयत्न करीत असताना आपण यहूदीसुद्धा पापी लोकांमध्ये आहोत, त्याचा अर्थ हा नाही की ख्रिस्त आपल्याला पाप करण्यास उत्तेजन देतात? नक्कीच नाही.
18जे मी उद्ध्वस्त केले ते जर मी पुन्हा बांधतो, तर मी खरोखरच नियमशास्त्र मोडणारा असा ठरतो.
19“नियमांद्वारे मी नियमाला मरण पावलो यासाठी की मी परमेश्वरासाठी जगावे.
20मी ख्रिस्ताबरोबर क्रूसावर खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतात. मी आता जे जीवन शरीरात जगतो ते मी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवून जगतो, ज्यांनी माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी दिले.
21मी परमेश्वराच्या कृपेला वगळत नाही, कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने नीतिमत्व प्राप्त होत असते, तर ख्रिस्ताचे मरण व्यर्थ झाले असते.”
에스겔 29
Judgment on Pharaoh of Egypt Like a Great Monster
1दहाव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या बाराव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
2“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहकडे आपले तोंड कर आणि त्याच्या व सर्व इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी कर.
3त्याच्याशी बोल आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
4मी तुझ्या जाभाडात गळ अडकवेन
5मी तुला व तुझ्या प्रवाहातील सर्व माशांना
6तेव्हा इजिप्तमध्ये राहणारे जाणतील की मीच याहवेह आहे.
7जेव्हा त्यांनी त्यांच्या हातांनी तुला पकडले, तू त्यांना खरडले व त्यांचे खांदे मोडले; जेव्हा ते तुझ्यावर टेकले, तेव्हा तू मोडलास व त्यांच्या कंबरा खचविल्या.
8“ ‘यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध तलवार आणेन, मनुष्य व जनावरे या दोघांनाही मारून टाकीन.
9इजिप्त देश निर्जन व ओसाड होईल. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.
10म्हणून मी तुझ्याविरुद्ध आणि तुझ्या प्रवाहांच्या विरुद्ध आहे आणि मिग्दोलपासून असवानपर्यंत, अगदी कूशच्या सीमेपर्यंत मी इजिप्त देश ओसाड व वैराण करेन.
11ना कोणी मनुष्य ना पशू त्यामधून जाईल; चाळीस वर्षे तिथे कोणी वस्ती करणार नाही.
12उजाडलेल्या देशांमध्ये इजिप्त देश मी सर्वात अधिक ओसाड करेन आणि सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये इजिप्तची शहरे चाळीस वर्षे ओसाड पडतील आणि इजिप्तच्या लोकांना मी राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन आणि इतर देशांमध्ये त्यांना पसरून टाकेन.
13“ ‘तरीही, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: चाळीस वर्षे संपल्यावर जिथे ते विखुरले गेले त्या राष्ट्रांमधून इजिप्तच्या लोकांना मी एकवट करेन.
14बंदिवासातून मी त्यांना इजिप्तच्या पथरोस भागात, त्यांच्या पूर्वजांचा देश पत्रोसला परत आणेन, तिथे ते कमी दर्जाचे राज्य होईल.
15ते सर्वात कमी दर्जाचे राज्य असतील आणि कधीही इतर राष्ट्रांच्या वर होणार नाहीत. मी त्याला इतके कमी करेन की ते राष्ट्रांवर पुन्हा राज्य करणार नाही.
16इजिप्त यापुढे इस्राएल लोकांसाठी आणखी आधार नसतील परंतु त्यांच्या पापाची आठवण म्हणून ते त्यांच्याकडे मदतीसाठी जातील. तेव्हा ते जाणतील की मीच सार्वभौम याहवेह आहे.’ ”
The Land of Egypt Given to Nebuchadnezzar
17सत्ताविसाव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
18“मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्याला कठोरतेने सोरविरुद्ध पाठवले; प्रत्येक डोके टकले झाले आणि प्रत्येक खांदा सोलून काढला. तरीही त्याने हे जे कठीण कष्टाचे अभियान सोरविरुद्ध चालविले त्याबद्दल त्याला व त्याच्या सैन्याला काहीही प्रतिफळ मिळाले नाही.
19यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी इजिप्त देशाला बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हाती देणार आहे आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल. तो हरण करून लुटून घेईल आणि तो देश त्याच्या सैन्याला मोबदला म्हणून होईल.
20त्याने केलेल्या परिश्रमासाठी मी त्याला इजिप्त देश त्याचे प्रतिफळ म्हणून दिला आहे, कारण त्याने व त्याच्या सैन्याने ते माझ्यासाठी केले, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
21“त्या दिवशी मी इस्राएलच्या घराण्याचे शिंग लांब उगवेन आणि त्यांच्यामध्ये तुझे तोंड उघडेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”
시편 78:1-37
God's Deeds Handed Down to the Generations
1अहो माझ्या लोकांनो, माझे विधिनियम ऐका;
2मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन;
3ज्यागोष्टी आम्ही ऐकल्या आणि आम्हाला समजल्या आहे,
4आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही,
5कारण त्यांनी आपले नियम याकोबाला दिले,
6जेणेकरून येणार्या पिढ्या,
7मग ते परमेश्वरावर आपला भरवसा ठेवतील
8ते त्यांच्या पूर्वजांसारखे नसतील—
9सर्व शस्त्रांनिशी धनुर्धारी असतानाही एफ्राईमच्या वंशजांनी
10त्यांनी परमेश्वराचा करार पाळला नाही,
11त्यांनी केलेली महत्कार्य,
12त्यांनी आपल्या पूर्वजांसमोर इजिप्तमधील
13परमेश्वराने समुद्र दुभागला आणि त्यातून त्यांना पार नेले;
14दिवसा ते त्यांना मेघाच्या साहाय्याने
15त्यांनी रानात खडक फोडले
16त्यांनी खडकाळ सुळक्यातून पाण्याचे झरे काढले
17असे असतानाही त्यांनी परमेश्वराविरुद्ध बंड करणे
18ज्या अन्नासाठी ते आसुसलेले होते त्याचा आग्रह धरून त्यांनी
19ते परमेश्वराच्या विरोधात बोलले;
20खरे आहे, त्यांनी खडकावर मारले,
21जेव्हा याहवेहने हे ऐकले, ते संतापले;
22कारण परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला नाही;
23त्यांनी आकाशाला उघडण्याची आज्ञा केली;
24लोकांच्या खाण्याकरिता त्यांनी मान्नाचा वर्षाव केला,
25मनुष्यांनी देवदूतांची भाकर खाल्ली;
26त्यांनी आकाशातून पूर्वेचा वारा सोडला
27त्यांनी धुळीप्रमाणे त्यांच्यावर मांसाचा पाऊस पाडला,
28त्यांनी त्यांच्या छावणीच्या आत,
29त्यांनी अधाशीपणाने तृप्त होईपर्यंत खाल्ले—
30पण त्यांना जे पाहिजे त्यापासून समाधानी होण्यापूर्वी,
31परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला;
32इतके सर्व झाले तरी ते लोक पाप करीतच राहिले;
33म्हणून त्यांनी त्यांचे आयुष्य निरर्थक केले
34जेव्हा परमेश्वर त्यांचा संहार करू लागले, तेव्हा ते त्यांच्या शोध घेऊ लागले;
35परमेश्वर आपल्या आश्रयाचा खडक आहेत
36परंतु ते केवळ त्यांच्या मुखाने त्यांची खुशामत करीत;
37त्यांची हृदये त्यांच्याशी प्रामाणिक नव्हती;