맥체인 성경 여정

성경읽기표 — 맥체인 1년 통독

성경읽기표를 따라 하루 4본문을 읽으며 1년에 구약 1회, 신약과 시편을 2회 통독합니다.

365 1년 고정 통독표
4 하루 4본문
271 선택한 일차
‹ 271일차 / 총 365일 오늘 ›
역본

통독 확인

이 일차의 맥체인 본문을 완료했나요?

확인 버튼을 누르면 마이페이지 맥체인 진도표에 완료로 기록됩니다.

가정 예배 · 구약

사무엘하 24

본문 열기 →
24장

David's Census and Its Punishment

1इस्राएली लोकांविरुद्ध याहवेहचा कोप पुन्हा भडकला आणि त्यांनी दावीदाला चिथविले, “जा आणि इस्राएल व यहूदीयाची शिरगणती कर.”

2म्हणून राजाने योआब व त्याच्या बरोबरच्या सेनापतींना सांगितले, “दानपासून बेअर-शेबापर्यंत इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून फिरून, लढाऊ पुरुषांची नोंदणी करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.”

3परंतु योआबाने राजाला उत्तर दिले, “याहवेह आपले परमेश्वर आपल्या सैन्यातील संख्या शंभरपटीने वाढवो आणि माझे स्वामी ते आपल्या डोळ्यांनी पाहो. परंतु गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात?”

4तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; तेव्हा ते इस्राएलच्या लढाऊ पुरुषांची गणती करण्यासाठी राजापुढून निघून गेले.

5यार्देन पार केल्यावर, त्यांनी अरोएर नगराच्या दक्षिणेकडील खोर्‍यात डेरा दिला, नंतर ते गादमधून जाऊन याजेरकडे गेले.

6नंतर ते गिलआद व तहतीम होदशी या प्रांतात गेले व तिथून दान यअनकडून वळसा घेऊन सीदोनकडे गेले.

7नंतर ते सोरच्या किल्ल्याकडे आणि हिव्वी व कनानी यांच्या सर्व नगरांकडे व शेवटी ते यहूदीयाच्या नेगेवप्रांतातील बेअर-शेबापर्यंत गेले.

8नऊ महिने वीस दिवस संपूर्ण देशात फिरल्यानंतर, ते यरुशलेमात परत आले.

9योआबाने राजाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: इस्राएलमध्ये धनुर्धारी आठ लाख व यहूदीयामध्ये पाच लाख पुरुष होते.

10योद्धे पुरुषांची गणती केल्यानंतर दावीदाचे मन त्याला टोचू लागले आणि त्याने याहवेहला म्हटले, “मी जे केले ते करून मी पाप केले आहे. तर आता हे याहवेह, मी आपणास विनंती करतो की आपल्या सेवकाचा दोष दूर करा; मी मूर्खपणा केला आहे.”

11दुसर्‍या दिवशी सकाळी दावीद उठण्यापूर्वी, दावीदाचा द्रष्टा, गाद संदेष्टा, याच्याकडे याहवेहचे वचन आले:

12“जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर, जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ”

13तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “तुमच्यासमोर देशभर तीन वर्षांचा दुष्काळ असावा? किंवा शत्रूकडून तुमचा पाठलाग होत असताना तीन महिने तुम्ही त्यांच्यापासून पळ काढावा? किंवा तुमच्या देशात तीन दिवस पीडा यावी? तर आता यावर विचार करून ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.”

14दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात आहे. आपण याहवेहच्या हाती पडू, कारण त्यांची कृपा अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.”

15तेव्हा याहवेहने इस्राएल देशात त्या सकाळपासून नेमलेल्या वेळेपर्यंत मरी पाठवली आणि दानपासून बेअर-शेबापर्यंत सत्तर हजार लोक मरण पावले.

16जेव्हा यरुशलेमचा नाश करण्यासाठी दूताने आपला हात लांब केला, तेव्हा याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि लोकांचा नाश करणार्‍या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ होता.

17दावीदाने जेव्हा लोकांचा नाश करणार्‍या दूताला पाहिले, तो याहवेहला म्हणाला, “मी पाप केले आहे; जो मी मेंढपाळ, तो मी चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो.”

David Builds an Altar at the Threshing Floor of Araunah

18त्या दिवशी गाद दावीदाकडे आला आणि त्याला म्हणाला, “जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध.”

19तेव्हा गादद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेनुसार दावीद वर गेला.

20राजा व त्याची माणसे आपल्याकडे येत आहेत असे जेव्हा अरवनाहने पाहिले, तेव्हा त्याने राजासमोर जाऊन भूमीकडे तोंड करून दंडवत घातले.

21अरवनाहने विचारले, “माझे स्वामी आपल्या सेवकाकडे का आले आहेत?”

22अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामींना मनास येईल ते त्यांनी घ्यावे व अर्पण करावे. हे पाहा होमार्पणासाठी बैल इकडे आहेत आणि लाकडासाठी मळणीची आऊते व बैलाचे जू येथे आहे.

23महाराज, अरवनाह हे सर्व राजाला देत आहे.” त्याचप्रमाणे अरवनाह हे सुद्धा म्हणाला, “याहवेह आपले परमेश्वर आपला स्वीकार करो.”

24परंतु राजा अरवनाहला म्हणाला, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. फुकट मिळालेले होमार्पण याहवेह माझ्या परमेश्वराला मी अर्पिणार नाही.”

25नंतर दावीदाने तिथे याहवेहप्रीत्यर्थ एक वेदी बांधली व होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पिली. तेव्हा दावीदाने देशाच्या वतीने केलेली प्रार्थना याहवेहने ऐकली आणि इस्राएलातील पीडा नाहीशी झाली.

가정 예배 · 신약

갈라디아서 4

본문 열기 →
4장

Called from Slaves to Sons

1आता मी असे म्हणतो की वारस जोपर्यंत बाळ आहे, तोपर्यंत तो सर्व मालमत्तेचा धनी असूनही, दासापेक्षा वेगळा नाही.

2पित्याने ठरविलेल्या वेळेपर्यंत, त्याला त्याचे पालक व कारभारी सांगतील तसे वागावे लागते.

3जेव्हा आम्ही बालक होतो, तेव्हा आम्ही जगाच्या आत्मिक तत्वांच्या दबावाखाली होतो.

4परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते.

5जे आपण नियमांच्या अधीन होतो, त्या आपल्याला खंडणी देऊन सोडवावे आणि पुत्र म्हणून दत्तक घ्यावे.

6कारण तुम्ही त्यांचे पुत्र आहात, म्हणूनच परमेश्वराने त्यांचा आत्मा आमच्या हृदयात पाठविला आहे, त्याद्वारेच आपण, “अब्बा, पिता अशी त्यांना हाक मारतो.”

7आता आपण दास नसून परमेश्वराची लेकरे झालो आहोत, जर लेकरे आहोत, तर परमेश्वराने आपल्याला त्यांचे वारसही केले आहे.

Do Not Turn Back to Weak Elemental Principles

8तुम्हाला परमेश्वराची ओळख होण्यापूर्वी, तुम्ही सुद्धा, जे वास्तविक परमेश्वर नाहीत, त्यांचे दास होता.

9पण आता ज्याअर्थी तुम्हाला परमेश्वराची ओळख झाली आहे, किंवा परमेश्वराद्वारे ओळखले गेला आहात, त्याअर्थी परत त्या दुबळ्या, दयनीय तत्वाच्या प्रभावाखाली का येता? पुन्हा त्याचे दास होण्याची आशा का धरता?

10तुम्ही विशेष दिवस, महिने, ॠतू आणि वर्ष हे पाळता!

11तुम्हासाठी केलेले माझे सारे कष्ट वाया गेले असावेत अशी मला भीती वाटते.

Paul's Heartfelt Appeal to the Galatians

12प्रिय बंधू व भगिनींनो, माझ्यासारखे व्हा, कारण मी तुमच्यासारखा झालो आहे. तुम्ही माझे काही नुकसान केले नाही.

13वास्तविक माझ्या शारीरिक आजारात मी तुम्हाला प्रथम शुभवार्तेचा प्रचार केला होता.

14माझ्या शारीरिक आजाराने जणू तुमची परीक्षा झाली, तरी तुम्ही माझा धिक्कार व अवमान केला नाही. उलट तुम्ही माझे स्वागत केले, जणू काही मी परमेश्वराचा दूत, किंवा स्वतः ख्रिस्त येशूच होतो.

15तुमची माझ्याविषयीची आशीर्वादाची वृत्ती आता कुठे आहे? मी साक्ष देतो, की शक्य झाले असते तर तुम्ही स्वतःचे डोळेदेखील काढून मला दिले असते.

16आता सत्य बोलून मी तुमचा शत्रू झालो काय?

17ते लोक तुम्हाला आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहेत, पण ते तुमच्या भल्यासाठी नाही. परंतु तुम्ही त्यांचे शिष्य व्हावे, म्हणून ते तुम्हाला आम्हापासून वेगळे करू पाहतात.

18आस्था असणे आणि उद्देश चांगला असणे गरजेचे आहे, केवळ मी तुमच्याबरोबर आहे तेव्हाच नव्हे तर नेहमीच असे असणे आवश्यक आहे.

19माझ्या प्रिय मुलांनो, ख्रिस्ताचे स्वरूप तुम्हामध्ये निर्माण होईपर्यंत मला प्रसूती वेदना होत राहतील.

20आताच मी तिथे तुमच्याबरोबर असतो व माझा सूर बदलू शकलो असतो, तर बरे झाले असते, कारण मी तुमच्या संदर्भात गोंधळात आहे.

Hagar and Sarah, an Allegory of Two Covenants

21मला सांगा, तुम्ही जे नियमांच्या अधीन राहू इच्छिता, त्या तुम्हाला नियम काय म्हणतात याची जाणीव नाही का?

22असे लिहिले आहे की अब्राहामाला दोन पुत्र होते एक दासीपासून झालेला, तर दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.

23त्या दासीपासून झालेला पुत्र दैहिकरितीने जन्मला, परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला पुत्र दैवी अभिवचनाचा परिणाम म्हणून जन्मला.

24अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे.

25आता हागार ही अरबस्थानातील सीनाय पर्वत असा आहे आणि आता अस्तित्वात असलेल्या यरुशलेम शहराचे प्रतीक आहे, कारण ती तिच्या संतानाबरोबर दास्यात आहे.

26परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे.

27जसे यशायाहने लिहिले आहे:

28आता बंधू व भगिनींनो, आपण इसहाकासारखे अभिवचनाची मुले आहोत.

29त्यावेळेस दैहिकरित्या जन्मलेल्या पुत्राने आत्म्याच्या शक्तीने जन्मलेल्या पुत्राचा छळ केला तसेच आताही होत आहे.

30पण शास्त्रलेखात काय लिहिले आहे? “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर कधीही वारस होणार नाही.”

31प्रिय बंधू व भगिनींनो, आपण दासीपुत्र नाही, तर आपण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.

개인 경건 · 구약/시편

에스겔 31

본문 열기 →
31장

Egypt Likened to a Cedar of Lebanon

1अकराव्या वर्षी, तिसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

2“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोह व त्याच्या सर्व लोकांना सांग:

3अश्शूरला पाहा, लबानोनमधील एक गंधसरू असलेला,

4पाण्याने त्याला पोषण दिले,

5म्हणून रानातील इतर सर्व झाडांपेक्षा;

6आकाशातील सर्व पक्ष्यांनी

7आपल्या पसरलेल्या फांद्या

8परमेश्वराच्या बागेतील देवदारू

9पुष्कळ फांद्यांनी

The Cedar Cut Down and Brought to Sheol

10“ ‘यास्तव सार्वभौम याहवेह म्हणतात: मोठे देवदारू दाट झाडींच्या वर उंच झाले आणि त्याला त्याच्या उंचीचा गर्व झाला,

11त्याच्या दुष्टतेनुसार त्याला वागवावे म्हणून मी त्याला राष्ट्रांच्या अधिपतींच्या हातात दिले. मी त्याला सोडून दिले आहे,

12आणि अधिक क्रूर विदेशी राष्ट्रांनी त्याचा छेद करून त्याला टाकून दिले. त्याच्या डहाळ्या डोंगरांवर व दर्‍यांमध्ये पडल्या; त्याच्या फांद्या देशाच्या सर्व झर्‍यांमध्ये तुटून पडल्या. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे त्याच्या सावलीतून बाहेर निघाले आणि त्यांनी त्याला टाकून दिले.

13सर्व पक्षी पडलेल्या झाडावर वस्ती करू लागले आणि सर्व जंगली जनावरे त्याच्या फांद्यांमध्ये राहू लागले.

14म्हणून पाण्याजवळ असलेले कोणतेही झाड यापुढे दाट झाडींच्या वर गर्वाने उंच वाढणार नाही. भरपूर पाणी मिळालेल्या झाडांपैकी कोणतेही झाड तेवढ्या उंचीपर्यंत वाढणार नाही; ते मरणास नेमलेले आहेत, पृथ्वीच्या खाली, मेलेल्यांमध्ये, जे मृतलोकात उतरले आहेत त्या लोकांत त्यांची जागा आहे.

15“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तो मृतलोकात आणला गेला, त्याच्यासाठी शोक करावा म्हणून खोल समुद्र मी झाकून टाकला; मी त्याचे प्रवाह थांबविले, आणि त्याचे विपुल पाणी मी रोखून ठेवले. त्याच्यामुळे मी लबानोनला दुःखित केले आणि रानातील प्रत्येक झाड वाळून गेले.

16गर्तेत जाणार्‍यांबरोबर त्याला मी अधोलोकात आणले, त्यात तो पडला तेव्हा त्याच्या आवाजाने राष्ट्रे थरथर कापले. तेव्हा एदेनातील सर्व झाडे, लबानोनातील सर्वोत्तम, पाण्याचा पुष्कळ पुरवठा असलेली झाडे, पृथ्वीच्या खाली सांत्वन पावले.

17मोठ्या देवदारूप्रमाणे ते सुद्धा मृतलोकात, राष्ट्रांच्या लोकांमध्ये त्याच्या सावलीखाली राहत होते त्या हत्यारबंदी लोकांबरोबर तलवारीने मारले गेले.

18“ ‘वैभव व ऐश्वर्यासंबंधात यापैकी एदेनातील कोणत्या झाडाची तुलना होऊ शकते? तरीही, तू सुद्धा एदेनातील झाडांबरोबर खाली पृथ्वीवर आणला जाशील; बेसुंती लोक, जे तलवारीने मारले गेले त्यांच्याबरोबर तू पडून राहशील.

개인 경건 · 신약

시편 79

본문 열기 →
79장

A Lament over the Defiled Temple

1हे परमेश्वरा, इतर राष्ट्रांनी तुमच्या वतनावर आक्रमण केले आहे;

2तुमच्या सेवकांचे मृतदेह उघड्यावर पडून आहेत,

3त्यांनी लोकांचे रक्त यरुशलेमच्या सभोवती

4आमच्या शेजार्‍यांसाठी व सभोवती असणार्‍यांसाठी,

5हे याहवेह, किती काळ? तुम्ही आमच्यावर सदासर्वकाळ संतप्त राहाल काय?

6अशा राष्ट्रांवर,

7त्यांनी याकोबाला गिळंकृत केले आहे

8आमच्या पूर्वजांच्या पातकांबद्दल आम्हाला दोषी धरू नका;

9हे आमच्या उद्धारक परमेश्वरा,

10इतर राष्ट्रांनी का म्हणावे,

11बंदिवानांचे उसासे तुम्ही ऐका;

12हे प्रभू, तुमची निंदा करणार्‍या या शेजार्‍यांचा

13मग आम्ही तुमचे लोक, तुमच्या कळपातील मेंढराप्रमाणे असलेले,