त्यांनी देवाचा कोश आणला आणि दावीदाने त्यासाठी जो तंबू तयार केला होता त्या ठिकाणी तो ठेवला आणि परमेश्वरासमोर होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केली.
KO
Copywork
Marathi OMRCV 역대상 16장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 역대상
होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केल्यानंतर दावीदाने लोकांना याहवेहच्या नावाने आशीर्वाद दिला.
नंतर त्याने इस्राएल लोकांच्या प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप व मनुक्यांची एक वडी वाटप केली.
इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचे गौरव, स्तुतिगान व त्यांचे उपकारस्मरण करण्याकरिता दावीदाने कोशापुढे सेवा करणार्या काही लेवी लोकांची नेमणूक केली:
वादकांचा प्रमुख आसाफ, पुढच्या श्रेणीत जखर्याह, येइएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्याह, एलियाब, बेनाइयाह, ओबेद-एदोम व ईयेल हे सतार व वीणा वाजवित, व आसाफ उंच स्वरात झांज वाजवित असे.
बेनाइयाह व यहजिएल हे याजक परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे नियमितपणे कर्णे वाजवित.
त्या दिवसापासून दावीदाने याहवेहची अशा प्रकारे उपकारस्तुती करण्यासाठी आसाफ व त्याचे सहायक नेमले:
याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा;
त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा;
त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा;
याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा;
परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार,
अहो त्यांचे सेवक, इस्राएलच्या वंशजांनो,
कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत.
ते आपला करार सर्वदा स्मरणात ठेवतात,
हा करार त्यांनी अब्राहामाशी केला,
आणि त्यांनी याकोबासाठी नियम
“मी तुम्हाला कनान देश
त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते
ते एका देशातून दुसर्या देशात,
याहवेहने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही;
“माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका;
हे सर्व पृथ्वी, याहवेहस्तव स्तुतिस्तोत्रे गा,
सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव,
कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत;
इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत.
राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात.
अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या,
याहवेहच्या नावाला योग्य तो गौरव द्या;
त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो!
आकाशे हर्ष करोत, पृथ्वी उल्लास करो;
सागर व त्यातील सर्वकाही गर्जना करोत;
वनातील सर्व झाडे गुणगान करो,
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत;
यांचा धावा करून म्हणा, हे आमच्या परमेश्वरा, आमचे तारण करा;
इस्राएलचे परमेश्वर याहवेहची,
दररोज गरजेप्रमाणे आसाफ आणि त्याचे भाऊबंद यांची याहवेहच्या कोशाची नियमितपणे करारबद्ध सेवा करण्यासाठी दावीदाने नेमणूक केली.
तसेच ओबेद-एदोम आणि त्याचे अडुसष्ट नातलग आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-एदोम आणि होसाह यांचा द्वारपाल म्हणून समावेश केला.
दावीदाने गिबोन टेकडीवरील याहवेहच्या सभामंडपात सादोक याजक आणि त्याचे याजक भाऊबंद सेवा करण्यासाठी ठेवले.
ते दररोज, सकाळ व संध्याकाळ, याहवेहने इस्राएली लोकांना दिलेल्या आज्ञेनुसार होमवेदीवर नियमितपणे होमार्पणे करीत होते.
त्यांच्यासोबत हेमान, यदूथून आणि नावे घेऊन निवडलेल्या इतर अनेकांची नेमणूक केली. या सर्वांना “याहवेहची प्रीती सनातन आहे” अशी त्यांची उपकारस्तुती करण्यासाठी नेमण्यात आले होते.
त्यांच्याबरोबर हेमान आणि यदूथून यांना कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करण्याची जबाबदारी दिली. यदूथूनच्या पुत्रांची द्वारपाल म्हणून नेमणूक करण्यात आली.
नंतर सर्व लोक आपापल्या नगरास परत गेले आणि दावीदही आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला.