शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली याहवेहची सेवा करीत होता. त्या दिवसात याहवेहचे वचन दुर्मिळ होते; दृष्टान्तही फारसे मिळत नसत.
EN
Copywork
Marathi OMRCV 1 Samuel 3장
Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
Practice by section · 1 Samuel
एका रात्री एलीची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला फारसे दिसत नव्हते, तो त्याच्या नेहमीच्या जागी पडून होता.
परमेश्वराचा दीप अजूनही विझला नव्हता आणि शमुवेल याहवेहच्या घरात परमेश्वराचा कोश होता त्या ठिकाणी निजला होता.
तेव्हा याहवेहने शमुवेलाला हाक मारली.
आणि तो धावत एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.”
याहवेहने पुन्हा, “शमुवेल!” अशी हाक मारली आणि शमुवेल उठला आणि एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.”
शमुवेलने तर अजूनही याहवेहला ओळखले नव्हते: याहवेहचे वचन आतापर्यंत त्याला प्रकट झाले नव्हते.
याहवेहने तिसर्यांदा हाक मारली, “शमुवेल!” आणि शमुवेल उठला आणि एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.”
म्हणून एलीने शमुवेलास सांगितले, “जा आणि झोप आणि जर त्यांनी पुन्हा तुला हाक मारली, तर म्हण, ‘याहवेह, बोला, कारण, तुमचा सेवक ऐकत आहे.’ ” तेव्हा शमुवेल गेला आणि त्याच्या जागेवर झोपला.
याहवेह आले आणि तिथे उभे राहिले आणि इतर वेळेप्रमाणे हाक मारली, “शमुवेल! शमुवेल!”
आणि याहवेह शमुवेलास म्हणाले: “पाहा, मी इस्राएलमध्ये असे काहीतरी करणार आहे, जे ऐकून प्रत्येकाचे कान भणभणतील.
एलीच्या घराण्याविषयी मी जे काही बोललो होतो ते; सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी करेन.
कारण मी त्याला सांगितले की, जे पाप त्याला माहीत होते त्यासाठी मी सर्वकाळ त्याच्या कुटुंबाचा न्याय करेन; त्याच्या पुत्रांनी परमेश्वराची निंदा केली आणि एली त्यांना आवरू शकला नाही.
म्हणून मी एलीच्या घराण्यासाठी अशी शपथ घेतली, ‘एलीच्या घराण्याच्या पापाचे प्रायश्चित यज्ञ किंवा अर्पणाने कधीही होणार नाही.’ ”
सकाळ होईपर्यंत शमुवेल झोपला आणि नंतर याहवेहच्या मंदिराची दारे उघडली. एलीला दृष्टान्त सांगण्यासाठी त्याला भीती वाटत होती,
परंतु एलीने त्याला बोलाविले आणि म्हटले, “शमुवेल, माझ्या मुला.”
“याहवेह तुला काय म्हणाले?” एलीने विचारले. “माझ्यापासून ते लपवू नकोस. ज्यागोष्टी त्यांनी तुला सांगितल्या त्या जर तू माझ्यापासून लपवून ठेवल्या तर परमेश्वर तुला फार कठीण शिक्षा देवो.”
तेव्हा शमुवेलाने त्याला सर्वकाही सांगितले, त्याच्यापासून काहीही लपवून ठेवले नाही. तेव्हा एली म्हणाला, “ते याहवेह आहेत; त्यांच्या दृष्टीने जे बरे ते करो.”
शमुवेल वाढत असता याहवेह त्याच्याबरोबर होते आणि त्यांनी शमुवेलाचे कोणतेही शब्द वाया जाऊ दिले नाही.
आणि दानपासून बेअर-शेबापर्यंत सर्व इस्राएली लोकांनी ओळखले की शमुवेल याहवेहचा संदेष्टा होण्यास प्रमाणित केलेला आहे.
याहवेहचे शिलोह येथे दर्शन होत राहिले आणि तिथे त्यांच्या वचनाद्वारे त्यांनी स्वतःला शमुवेलास प्रकट केले.