मग मोशेने इस्राएली लोकांच्या संपूर्ण समुदायाला बोलाविले व त्यांना म्हटले, “ज्यागोष्टी तुम्ही कराव्या अशी याहवेहनी आज्ञा दिली आहे, त्या या आहेत:
KO
Copywork
Marathi OMRCV 출애굽기 35장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 출애굽기
सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातवा दिवस तुमचा पवित्र दिवस असेल, हा याहवेहप्रीत्यर्थ शब्बाथ विसाव्याचा दिवस असावा. जो कोणी या दिवशी काम करेल, त्याला जिवे मारावे.
शब्बाथ दिवशी तुमच्या कोणत्याही घरामध्ये विस्तव पेटवू नये.”
मोशे सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “याहवेहने जे आज्ञापिले आहे ते हे:
तुमच्याजवळ जे काही आहे, त्यातून याहवेहसाठी अर्पण घ्या. ज्या कोणास याहवेहसाठी अर्पण आणावे अशी इच्छा आहे, त्यांनी हे अर्पण आणावे:
निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग;
लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म ;
दिव्यासाठी जैतुनाचे तेल;
एफोदाच्या ऊरस्त्राणावर चढविण्यासाठी गोमेद खडे व इतर रत्ने.
“तुमच्यामध्ये जे सर्व कुशल कारागीर आहेत, त्यांनी येऊन जे सर्वकाही याहवेहने आज्ञापिले आहे ते तयार करावे:
“निवासमंडप, त्याचा तंबू आणि त्याचे आच्छादन, आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका;
कोश व त्याचे दांडे आणि प्रायश्चिताचे झाकण व त्याचा पडदा;
मेज व त्याचे दांडे आणि त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर;
प्रकाशासाठी दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे, दिवे आणि प्रकाशासाठी तेल;
धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप;
होमार्पणाची वेदी, तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य;
अंगणाचे पडदे, त्यांच्या खुंट्या व बैठका आणि अंगणाच्या दाराचा पडदा;
निवासमंडप, त्याचे अंगण व त्यांच्या मेखा व त्यांच्या दोर्या;
पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे; आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे.”
मग इस्राएलचा सर्व समुदाय मोशेच्या समक्षतेतून निघून गेला,
आणि ज्यांची इच्छा असेल व ज्यांच्या हृदयाला स्फूर्ती मिळाली त्यांनी सभामंडपाच्या कामासाठी व त्याच्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांची अर्पणे याहवेहसाठी आणली.
ज्या कोणाला इच्छा झाली, त्या स्त्री आणि पुरुषांनी येऊन सर्वप्रकारचे सोन्याचे दागिने, रत्नखचित पीना, कानातील डूल, अंगठ्या आणि दागिने आणले. त्या सर्वांनी आपले सोने याहवेहसाठी ओवाळणीचे अर्पण म्हणून दिले.
ज्यांच्याकडे निळे, जांभळे किंवा किरमिजी कापड किंवा रेशमी तागाचे होते किंवा बोकडाचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी किंवा टिकाऊ चर्म होते ते आणले.
चांदी किंवा कास्याची अर्पणे आणणार्यांनी ती याहवेहसाठी आणली आणि ज्या कोणाकडे बाभळीचे लाकूड होते, ते त्यांनी बांधकामाच्या कोणत्याही भागात उपयोगी पडेल असे म्हणून आणले.
प्रत्येक कुशल स्त्रीने निळे, जांभळे आणि किरमिजी सूत व रेशमी ताग जे तिने आपल्या हाताने विणले होते ते आणले.
आणि ज्या सर्व स्त्रियांना इच्छा झाली आणि ज्या सूतकताईत कुशल होत्या त्यांनी बोकडाचे केस कातले.
पुढार्यांनी एफोद व ऊरपट यावर लावण्यासाठी गोमेद व इतर रत्ने आणली.
त्याचप्रमाणे त्यांनी दिव्यासाठी आणि अभिषेकासाठी आणि सुवासिक धुपासाठी जैतुनाचे तेल व सुगंधी मसाले आणले.
याहवेहने मोशेद्वारे जे काम आज्ञापिले होते त्यासाठी इस्राएली लोकांमधील सर्व इच्छुक पुरुष व स्त्रियांनी याहवेहकरिता स्वखुशीने अर्पणे आणली.
मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे,
आणि याहवेहने त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे—
सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करावे,
आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करावे.
आणि याहवेहने त्याला व दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब या दोघांना इतरांनाही शिकविण्याची क्षमता दिली आहे.
याहवेहने त्यांना सर्वप्रकारचे कोरीव काम, कारागिरीचे काम, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुती व रेशमी तागावर भरतकाम, विणकाम; अशा सर्वप्रकारच्या विणकरांना कारागिरीचे—कौशल्याचे—काम करण्याच्या दानांनी भरले आहे.