मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात नेले.
KO
Copywork
Marathi OMRCV 마태복음 4장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 마태복음
चाळीस दिवस व चाळीस रात्र त्यांनी उपवास केला, तेव्हा त्यांना भूक लागली.
मग परीक्षक येशूंकडे आला व म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना भाकरीत रूपांतर होण्यास सांग.”
तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “ ‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल’ असे लिहिले आहे.”
मग सैतानाने पवित्र नगरीतील मंदिराच्या सर्वात उंच टोकावर त्यांना उभे केले.
तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे:
तेव्हा येशूंनी प्रत्युत्तर दिले, “असेही लिहिले आहे: ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ”
मग सैतानाने येशूंना एका उंच पर्वतावर नेले. तिथून त्याने त्यांना जगातील सर्व राज्ये व त्याचे गौरव दाखविले.
“जर तू पाया पडून माझी उपासना करशील,” तो म्हणाला, “तर हे सर्व मी तुला देईन.”
येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर जा! असे लिहिले आहे: ‘केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ”
मग सैतान त्यांना सोडून निघून गेला आणि देवदूतांनी येऊन त्यांची सेवा केली.
योहानाला बंदिवासात टाकले आहे हे ऐकताच, येशू गालील प्रांतात निघून गेले.
नासरेथ सोडल्यानंतर जबुलून व नफताली या प्रांताजवळ असलेल्या सरोवराच्या किनार्यावरील कफर्णहूम येथे गेले.
या घटनेने संदेष्टा यशायाह याने केलेले भाकीत पूर्ण झाले. ते असे:
“जबुलून प्रांत आणि नफताली प्रांत,
अंधारात राहणाऱ्या लोकांनी
तेव्हापासून येशूंनी उपदेश करण्यास सुरुवात केली, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन ज्याचे नाव पेत्र असेही होते आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना पाहिले. ते सरोवरात जाळे टाकीत होते, कारण ते मासे धरणारे होते.
येशू त्यांना म्हणाले, “चला माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.”
लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.
किनार्यावरून पुढे गेल्यावर त्यांनी आणखी दोन भाऊ, म्हणजे जब्दीचे पुत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहानला पाहिले. ते आपल्या वडिलांसह होडीत बसून आपली जाळी तयार करत होते. येशूंनी त्यांनाही हाक मारून बोलाविले,
आणि ताबडतोब त्यांनी नाव व आपला पिता यांना सोडून त्यांच्यामागे गेले.
येशू सभागृहांमध्ये शिक्षण देत, राज्याच्या शुभवार्तेची घोषणा, व लोकांचा प्रत्येक आजार आणि विकार बरे करीत सर्व गालील प्रांतात फिरले.
त्याचा वृतांत गालील प्रांताच्या सीमेपलीकडेही पसरत गेला. त्यामुळे सीरियासारख्या दूरदूरच्या ठिकाणाहूनही आजारी लोक बरे होण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. कसल्याही प्रकारचा आजार किंवा वेदना झालेले, भूतग्रस्त किंवा झटके येत असलेले, तसेच पक्षघात झालेले लोक, या सर्वांना त्यांनी बरे केले.
गालील प्रांत, दकापलीस , यरुशलेम, यहूदीया आणि यार्देन पलीकडील प्रदेशातून येथूनही मोठा समुदाय त्यांच्यामागे आला.