मी पुन्हा वर पाहिले आणि उडत असलेली एक चर्मपत्राची गुंडाळी मला दिसली.
KO
Copywork
Marathi OMRCV 스가랴 5장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 스가랴
त्या दूताने मला विचारले, “तुला काय दिसते?”
मग तो मला म्हणाला, “हा तो शाप आहे, जो या सर्व भूमीवर येणार आहे; चर्मपत्राच्या गुंडाळीच्या एका बाजूस जे लिहिलेले आहे ते असे, देशातून प्रत्येक चोर घालवून दिला जाईल आणि दुसर्या बाजूस म्हटले आहे, जो कोणी शपथ घेऊन खोटे बोलतो, त्या दोषीलाही देशातून घालवून दिले जाईल.
सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘मी हा शाप पाठवेन, तो प्रत्येक चोराच्या घरात व माझ्या नावाने खोटी शपथ वाहणार्या प्रत्येकाच्या घरात प्रवेश करेल. तो त्या घरावर राहील आणि त्याचे लाकूड व दगडासहित सर्वाचा संपूर्ण नाश करेल.’ ”
मग जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो पुढे आला आणि मला म्हणाला, “वर पाहा आणि बघ काय प्रगट होत आहे.”
मी विचारले, “ते काय आहे?”
मग तिचे शिसाचे झाकण वर उघडले गेले आणि त्या टोपलीच्या आत बसलेली एक स्त्री मला दिसली!
याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “ती दुष्टाई आहे.” असे म्हणून त्याने तिला पुन्हा त्या टोपलीत ढकलले आणि त्या टोपलीचे शिसाचे झाकण बंद केले.
मग मी वर बघितले—आणि मला दोन स्त्रिया उडतांना दिसल्या, त्यांच्या पंखात वारा भरलेला होता! त्यांचे पंख करकोचाच्या पंखांप्रमाणे होते आणि त्यांनी ती टोपली आकाश व पृथ्वीच्या मध्ये उचलली.
तेव्हा जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता त्याला मी विचारले, “ती टोपली त्या कुठे नेत आहेत?”
त्याने उत्तर दिले, “शिनार देशात, तिच्याकरिता घर बांधण्यासाठी. जेव्हा घर तयार होईल, तेव्हा ही टोपली त्यामध्ये तिच्या ठिकाणी ठेवण्यात येईल.”