किंख्रिया मंडळीतील आपली बहीण फीबी जी सेविका आहे, तिची शिफारस करतो.
KO
Copywork
Marathi OMRCV · 16:1-16 Greetings and Commendation of Fellow Workers
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 로마서
मी तुम्हाला सांगतो की प्रभूच्या लोकांना शोभेल असे तिला प्रभूमध्ये स्वीकारा आणि जी काही मदत तिला तुमच्यापासून पाहिजे ती द्या, कारण तिने अनेक लोकांचे व माझेही साहाय्य केले आहे.
प्रिस्किल्ला व अक्विला ख्रिस्त येशूंमधील माझे सहकारी, यांना सदिच्छा कळवा.
त्यांनी माझ्याकरिता त्यांचा जीवही धोक्यात घातला; आणि केवळ मीच नाही, तर गैरयहूदीयांच्या सर्व मंडळ्याही त्यांचे ऋणी आहेत.
त्यांच्या घरात जमणार्या मंडळीला माझ्या सदिच्छा कळवा.
जिने तुम्हासाठी खूप परिश्रम केले त्या मरीयेलाही सदिच्छा सांगा.
माझे यहूदी बंधू अंद्रोनीक व युनिया, जे माझ्याबरोबर तुरुंगात होते त्यांना पण सदिच्छा द्या. प्रेषितांमध्ये त्यांचे स्थान अवर्णनीय आहे व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तात होते.
प्रभूमध्ये प्रिय मित्र आंप्लियात याला माझ्या सदिच्छा कळवा.
तसेच ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय मित्र स्ताखु यांना सदिच्छा कळवा.
अपिल्लेस जो ख्रिस्ताशी एकनिष्ठ असून परीक्षेस उतरलेला आहे त्याला सदिच्छा कळवा.
माझा नातेवाईक हेरोदियोन याला सदिच्छा द्या.
त्रेफैना आणि त्रेफोसा, या स्त्रियांनी प्रभूमध्ये खूप श्रम केले, त्यांना सदिच्छा कळवा.
प्रभूने निवडून घेतलेला रूफस आणि त्याची आई, जी माझीही आई आहे, त्यांना सदिच्छा कळवा.
असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रोबास, हेर्मेस यांना व त्यांच्याबरोबर असणार्या सर्व बंधू व भगिनींना सदिच्छा कळवा.
फिललग, युलिया, नीरिय व त्याची बहीण, ओलुंपास, व त्यांच्या बरोबरच्या सर्व पवित्र जणांना सदिच्छा कळवा.
एकमेकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा.