जे तुम्ही दुसर्यांना दोष लावता, एखाद्या विषयाला धरून दुसर्यांचा न्याय करता, त्यावेळी तुम्ही स्वतः दोषी ठरता; कारण तुम्ही जे न्याय करणारे आहात, ते स्वतःच त्या गोष्टी करता. यामुळे, तुम्हाला कोणतीच सबब सांगता येणार नाही.
KO
Copywork
Marathi OMRCV · 2:1-11 God's Righteous Judgment on Those Who Judge Others
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 로마서
आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरूद्ध परमेश्वराचा न्याय सत्यावर आधारलेला आहे.
तुम्ही सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करता, पण तीच कृत्ये स्वतः करता तर, तुम्ही परमेश्वराच्या न्यायातून सुटाल असे तुम्हाला वाटते का?
त्यांचा विपुल दयाळूपणा, धीर आणि सहनशीलता यांचा अवमान करून परमेश्वराची दया तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे तुला समजत नाही का?
तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात.
परमेश्वर “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे योग्य ते प्रतिफळ देतील.”
जे धीराने चांगले कार्य करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशीतेसाठी खटपट करतात, त्यांना ते सार्वकालिक जीवन देतील.
पण जे स्वार्थी आणि सत्याचा नकार करणारे आणि दुष्ट मार्गांनी चालतात, त्यांच्यावर कोप व क्रोध राहील.
वाईट करणार्या प्रत्येक मनुष्यावर; प्रथम यहूदीयावर आणि मग गैरयहूदीयांवर क्लेश आणि संकटे येतील.
परंतु सर्व चांगले काम करणार्यांना; प्रथम यहूदी, नंतर गैरयहूदीयांना परमेश्वराकडून गौरव, सन्मान व शांती ही लाभतील.
कारण परमेश्वर पक्षपात करीत नाहीत.