याच सुमारास यहूदाह आपल्या भावांना सोडून अदुल्लाम येथे आला आणि हीरा नावाच्या एका मनुष्याबरोबर राहू लागला.
JA
Copywork
Marathi OMRCV Genesis 38장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Genesis
तिथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची कन्या यहूदाहच्या दृष्टीस पडली आणि तिच्याशी विवाह करून त्याने तिचा स्वीकार केला;
ती गर्भवती झाली, तिला पुत्र झाला. त्याचे नाव एर ठेवण्यात आले.
ती पुन्हा गर्भवती झाली, तिला पुत्र झाला, त्याचे नाव ओनान ठेवण्यात आले.
तिने आणखी एका पुत्राला जन्म दिला व त्याचे नाव शेलाह ठेवले, ते कजीब येथे राहत असताना तिने त्याला जन्म दिला.
यहूदाहने आपला ज्येष्ठपुत्र एर याचा विवाह तामार नावाच्या एका स्त्रीशी करून दिला.
परंतु यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर, याहवेहच्या नजरेत एक दुष्ट मनुष्य होता म्हणून याहवेहने त्याला ठार मारले.
तेव्हा यहूदाह ओनान यास म्हणाला, “तू तिचा दीर असल्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तामारेशी विवाह केला पाहिजे, म्हणजे तुझ्यापासून तिला तुझ्या भावाचे संतान होतील.”
ओनानला हे ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही म्हणून ज्यावेळी तो तिच्याशी समागम करी, त्यावेळी तो आपले वीर्य जमिनीवर पाडी, यासाठी की त्याच्यापासून भावाला संतती होऊ नये.
हे त्याचे कृत्य याहवेहच्या दृष्टीने एक फार मोठे पाप होते; म्हणून याहवेहने त्यालाही मारून टाकले.
यहूदाह आपली सून तामारला म्हणाला, “माझा पुत्र शेलाहचे विवाहाचे वय होईपर्यंत तू तुझ्या वडिलांच्या घरात विधवा म्हणून राहा.” यहूदाहला भीती वाटत होती की हा मुलगाही आपल्या भावांप्रमाणे मरेल. मग तामार तिच्या वडिलांच्या घरी गेली.
कालांतराने यहूदाहची पत्नी जी शूवाची मुलगी होती ती मरण पावली. शोक करण्याचे दिवस संपल्यावर यहूदाह, आपला मित्र अदुल्लाम येथील हीरा, याच्याबरोबर आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्यांकडे तिम्ना येथे गेला.
“तुझा सासरा तिम्ना येथे मेंढरांची लोकर कातरण्यासाठी गेला आहे,” असे कोणीतरी तामारेला सांगितले.
तिने आपले वैधव्यदशेत वापरण्याचे कपडे बाजूला ठेवून दिले आणि आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून तिने अंगावर बुरखा घेतला. मग तिम्नाच्या वाटेवर असलेल्या एनाईम गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ती जाऊन बसली. कारण तिने पाहिले की, शेलाह आता मोठा झाला असला तरी तिला त्याची पत्नी म्हणून दिले गेले नाही.
तिथून जाताना यहूदाहने तिला पाहिले आणि तिच्या तोंडावर बुरखा असल्यामुळे त्याला वाटले की ती एक वेश्या आहे,
म्हणून तो तिच्याजवळ जाऊन थांबला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्याशी रत होण्याची माझी इच्छा आहे.” अर्थात् ती आपली सून आहे, हे त्याला माहीत नव्हते.
त्याने म्हटले, “मी तुला माझ्या कळपातून एक कोवळी शेळी पाठवून देईन.”
“तुला काय तारण हवे आहे?” त्याने तिला विचारले.
यानंतर तिने वैधव्यदशेतील आपले कपडे पुन्हा धारण केले.
यहूदाहने आपला अदुल्लामी मित्र हीरा, याला तिच्याकडे कोवळी शेळी घेऊन जाण्यास आणि तिला दिलेल्या गहाण वस्तू परत आणण्यात सांगितले; पण हीराला ती सापडली नाही.
म्हणून त्याने एनाईम गावातील काही लोकांना विचारले, “गावाच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर बसलेली देवदासी कुठे राहते?”
तेव्हा तो यहूदाहकडे परत गेला आणि त्याने त्याला सांगितले, “मला ती कुठेच सापडली नाही, तसेच तेथील लोकांनी सांगितले की आमच्या गावात कोणी देवदासी राहत नाही.”
यावर यहूदाह म्हणाला, “मग त्या वस्तू तिच्याकडेच राहू दे. नाहीतर तेथील लोकांसाठी आपण उपहासाचा विषय होऊ. मी तर तुझ्यामार्फत तिच्यासाठी ही कोवळी शेळी पाठविली होती, पण ती तुला आढळली नाही.”
सुमारे तीन महिन्यानंतर, “तुझी सून तामार ही वेश्याकर्मामुळे गर्भवती झाली आहे,” अशी बातमी यहूदाहच्या कानावर गेली.
त्याप्रमाणे ते तिला जाळून टाकण्यासाठी बाहेर घेऊन जात असताना तिने आपल्या सासर्याला निरोप पाठविला, “ही मुद्रिका, हा गोफ आणि ही काठी ज्याची आहे, त्याच्यापासून मला गर्भ राहिलेला आहे. तुम्ही या वस्तू ओळखता काय?”
यहूदाहने त्या वस्तूंना ओळखले आणि म्हटले, “माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे, कारण माझा पुत्र शेलाह तिला पती म्हणून दिला नाही.” यानंतर त्याने कधीही तिच्याशी शरीरसंबंध ठेवला नाही.
योग्य वेळी तामारेचे दिवस भरले आणि तिला जुळे पुत्र झाले.
त्यांचा जन्म होत असताना, एका मुलाने प्रथम हात बाहेर काढला, त्याच्या मनगटावर सुइणीने शेंदरी रंगाचा दोरा बांधला व ती म्हणाली, “हा प्रथम जन्माला आला.”
परंतु त्याने त्याचा हात मागे ओढून घेतला आणि त्याचा भाऊ बाहेर आला, ती म्हणाली, “तर अशाप्रकारे तू वाट काढली!” आणि त्याचे नाव पेरेस ठेवले.
यानंतर लवकरच मनगटावर शेंदरी दोरा असलेले मूल जन्मले आणि त्याचे नावे जेरह असे ठेवण्यात आले.