इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे:
JA
Copywork
Marathi OMRCV Proverbs 1장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Proverbs
सुज्ञान आणि शिक्षण मिळविण्यासाठी;
समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी,
जे साधे भोळे आहेत त्यांना समंजसपणा देण्यासाठी,
शहाण्यांनी ऐकावे आणि त्यांचे ज्ञान वाढवावे,
ज्ञानी मनुष्याची नीतिसूत्रे व बोधकथा,
याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय,
माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे
ती तुझ्या मस्तकाला अलंकृत करणारी माळ आहे
माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील,
जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये;
चला कबरेसारखे आपण त्यांना जिवंत गिळंकृत करू,
आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल
आमच्याबरोबर चिठ्ठी टाक;
माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस,
कारण दुष्कर्म करण्यासाठी त्यांचे पाय धावतात,
जिथे पक्षी स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल असे जाळे पसरविणे किती व्यर्थ आहे!
ही माणसे स्वतःच्याच रक्तपातासाठी टपून बसतात;
गैरमार्गाने प्राप्त केलेल्या मिळकतीचा जे लोभ धरतात,
बाहेर उघडपणे सुज्ञान मोठ्याने आव्हान करते .
भिंतीच्या उंचीवरून ती ओरडते
“अहो भोळ्यांनो, तुमच्या भोळेपणावर तुम्ही किती दिवस प्रीती करणार?
मी केलेली कान उघाडणी लक्षात घेऊन आणि पश्चात्ताप करा!
परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले,
कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही.
यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन;
जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल,
“तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही;
कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला,
ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत;
त्यांना त्यांच्या मार्गाचे प्रतिफळ मिळेल,
कारण भोळ्यांचा हट्टीपणा त्यांना मारून टाकेल,
परंतु जे माझे ऐकतात ते सर्वजण सुरक्षित राहतील,