तट बांधल्यावर मी वेशींना दारे लावली. द्वारपाल, संगीतकार व लेवी यांची नेमणूकही केली;
JA
Copywork
Marathi OMRCV Nehemiah 7장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Nehemiah
मी यरुशलेमच्या शासनाची जबाबदारी माझा भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्याह यांना दिली. हनन्याह अत्यंत विश्वासू असून सर्व लोकांपेक्षा तो परमेश्वराचे भय अधिक बाळगत असे.
मी त्यांना म्हणालो, “यरुशलेमच्या वेशी सूर्य बराच उष्ण होईपर्यंत उघडण्यात येऊ नयेत. पहारेकरी कामावर असतानाच, सर्व वेशींना अडसर लावून त्या बंद करण्यात याव्या. तसेच यरुशलेममधील रहिवाशांनाच पहारेकरी म्हणून नेमावे. काहीजण त्यांच्या चौकीवर तर काहींनी त्यांच्या घराजवळच्या भागाचे रक्षण करावे.”
शहर मोठे व विस्तृत होते, पण लोकसंख्या थोडी होती आणि जी घरे होती, त्यांची पुनर्बांधणी झाली नव्हती.
नंतर माझ्या परमेश्वराने शहराच्या सर्व प्रतिष्ठितांना, अधिकाऱ्यांना व सामान्य नागरिकांना एकत्र करून वंशावळ्यांप्रमाणे त्यांची नोंदणी करावी असे विचार माझ्या मनात घातले. जे सर्वप्रथम परतले त्यांच्या वंशावळ्याची नावनिशी मला सापडली. तिच्यात असे लिहिले होते:
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने जे लोक धरून नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले त्यांच्या नावांची यादी ही आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले.
जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, अजर्याह, रामयाह, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ, बिग्वई, नहूम व बाअनाह):
पारोशचे वंशज 2,172,
शफाट्याहचे 372,
आरहचे 652,
पहथ-मोआब (येशूआ व योआब यांच्या कुळातून) 2,818,
एलामचे 1,254,
जत्तूचे 845,
जक्काईचे 760,
बिन्नुईचे 648,
बेबाईचे 628,
अजगादचे 2,322,
अदोनिकामचे 667,
बिग्वईचे 2,067,
आदीनचे 655,
हिज्कीयाहच्या कुळातले आतेरचे 98,
हाशूमचे 328,
बेसाईचे 324,
हारीफचे 112,
गिबोनचे 95,
या ठिकाणातून पुरुष:
अनाथोथचे 128,
बेथ-अजमावेथचे 42,
किर्याथ-यआरीम, कफीराह व बैरोथचे 743,
रामाह व गेबाचे 621,
मिकमाशचे 122,
बेथेल व आयचे 123,
दुसऱ्या नबोचे 52,
दुसऱ्या एलामचे 1,254,
हारीमचे 320,
यरीहोचे 345,
लोद, हादीद व ओनोचे 721,
सनाहाचे 3,930.
याजक:
इम्मेरचे 1,052,
पशहूरचे 1,247,
हारीमचे 1,017.
लेवी: यांचे वंशज:
संगीतकार:
मंदिराचे द्वारपाल: यांचे वंशज:
मंदिराचे सेवक: खालील लोकांचे वंशज:
केरोसचे, सीयाचे, पादोनचे,
लबानाहचे, हगाबाहचे, शलमाईचे,
हानानचे, गिद्देलचे, गहरचे,
रेआयाहचे, रसीनचे, नकोदाचे,
गज्जामचे, उज्जाचे, पासेआहचे,
बेसाईचे, मऊनीमचे, नफूसीमचे,
बकबुकचे, हकूफाचे, हर्हूरचे,
बसलूथचे, महीदाचे, हर्षाचे,
बर्कोसचे, सिसेराचे, तामहचे,
नसीयाहचे व हतीफाचे.
शलोमोनच्या सेवकांचे वंशज: पोकेरेथ-हस्सबाईम व आमोन.
यालाहचे, दर्कोनचे, गिद्देलचे,
शफाट्याहचे, हत्तीलचे, पोखेरेथ-हज्ज़ेबाइमचे, आमोनचे,
मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392.
याच वेळी पर्शियाचा तेल-मेलाह, तेल-हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या शहरातून पुढील लोक आले. पण त्यांच्या वंशावळी हरवल्यामुळे ते इस्राएली वंशज असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत:
ते यांचे वंशज होते:
आणि याजक पितृकुळातील:
यांनी आपल्या वंशावळींचा शोध घेतला, परंतु त्यांना ते सापडले नाही, म्हणून त्यांना अशुद्ध म्हणून याजकपदातून वगळण्यात गेले.
यास्तव राज्यपालांनी उरीम व थुम्मीम यांचा उपयोग करताना इतर याजक असल्याशिवाय त्यांना अर्पणातील अन्नाचा याजकांचा वाटा घेण्यास परवानगी दिली नाही.
सर्व सभेचे एकूण 42,360 लोक होते.
याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी आणि 245 गायक व गायिका होत्या.
त्यांनी आपल्याबरोबर 736 घोडे, 245 गाढव,
435 उंट आणि 6,720 गाढवे आणली होती.
त्यांच्यातील काही पुढार्यांनी कामासाठी देणग्या दिल्या. राज्यपालाने 1,000 दारिक सोने, धार्मिक विधींसाठी लागणारे 50 कटोरे, आणि याजकांसाठी पोशाखांचे 530 संच दिले.
काही कुलप्रमुखांनी कामासाठी भांडारात 20,000 दारिक सोने, 2,200 मीना चांदी दिली.
बाकीच्या लोकांनी 20,000 दारिक सोने, 2,000 मीना चांदी आणि याजकांसाठी 67 झगे दिले.
इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएली लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले.