हे सर्व होत असताना, पेत्र अंगणात बाहेर बसला होता आणि एक दासी त्याच्याकडे आली व ती त्याला म्हणाली, “तू गालीलकर येशूंबरोबर होतास.”
JA
Copywork
Marathi OMRCV · 26:69-75 Peter Denies Jesus
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Matthew
परंतु पेत्राने सर्वांच्यासमोर नकार दिला. तो म्हणाला, “तू कशाबद्दल बोलतेस हे मला समजत नाही.”
मग तो बाहेरील आवाराच्या दाराजवळ गेला, तिथे त्याला दुसर्या एका दासीने पाहिले आणि ती लोकांना म्हणाली, “हा मनुष्य नासरेथच्या येशूंबरोबर होता.”
या खेपेसही पेत्र नाकारून आणि शपथ घेऊन म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही!”
थोड्या वेळाने जी माणसे तिथे उभी होती, ती पेत्राला म्हणाली, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस हे आम्हाला माहीत आहे. तुझ्या भाषा-शैलीवरून आम्ही हे सांगू शकतो.”
हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.”
त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.