“चला, आपण याहवेहकडे परत जाऊ.
ते आम्हाला दोन दिवसात पुनरुज्जीवन देतील;
चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या;
“एफ्राईमा मी तुमचे काय करू?
म्हणून माझ्या संदेष्ट्याद्वारे मी तुमचे तुकडे केले आहे,
कारण मला तुमची अर्पणे नव्हे, तर दया हवी आहे,
आदामाप्रमाणे तुम्ही माझा करार मोडला आहे;
गिलआद हे दुष्कर्म करणारे शहर आहे,
जसे लुटारू बळी पडणाऱ्याची वाट पाहत दबा धरून बसतात,
मी इस्राएलमध्ये एक भयानक गोष्ट पाहिली आहे:
“हे यहूदाह, तुझ्यासाठी