पीडेनंतर याहवेहने मोशे व अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला म्हटले,
JA
Copywork
Marathi OMRCV Numbers 26장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Numbers
“इस्राएली लोकांच्या संपूर्ण समाजाची त्यांच्या घराण्यानुसार—जे सर्व वीस किंवा अधिक वयाचे असून इस्राएलच्या सैन्यात सेवा करण्यास सक्षम आहेत, त्यांची जनगणना कर.”
म्हणून मोशे व एलअज़ार याजक मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीच्या काठावर इस्राएली लोकांशी बोलले आणि म्हणाले,
“याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे जे पुरुष वीस किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांची मोजणी करा.”
रऊबेन, इस्राएलच्या प्रथम जन्मलेल्या पुत्राचे वंशज हे:
हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ;
ही रऊबेनची कुळे होती; मोजलेल्यांची संख्या 43,730 भरली.
पल्लूचा पुत्र एलियाब होता,
आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते.
ज्यावेळी पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि कोरह व त्याच्या अनुयायांना गिळून टाकले व त्यांच्यातील दोनशे पन्नास पुरुषांना अग्नीने भस्म करून टाकले. ते लोकांसाठी एक चेतावणीचे चिन्ह होते.
तरीही कोरहाचे सर्वच वंशज मेले नाही.
शिमओनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
जेरहपासून जेरही कूळ;
ही शिमओनी कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 22,200 भरली.
गादचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
ओजनीपासून ओजनी कूळ;
अरोदपासून अरोदी कूळ;
ही गादची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 40,500 भरली.
एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले.
यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
पेरेसचे वंशज हे होते:
ही यहूदाहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 76,500 भरली.
इस्साखारचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
याशूबपासून याशूबी कूळ;
ही इस्साखारची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 64,300 भरली.
जबुलूनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
ही जबुलूनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 60,500 भरली.
योसेफाचे कूळ त्याचे वंशज मनश्शेह व एफ्राईमचे कूळ हे होते:
मनश्शेहचे वंशज:
हे गिलआदाचे वंशज होते:
अस्रिएलपासून अस्रिएली कूळ;
शेमीदापासून शेमीदाई कूळ;
(हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.)
ही मनश्शेहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 52,700 भरली.
एफ्राईमचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
शुथेलहाचे वंशज हे होते:
हे एफ्राईमचे कूळ होते; जे मोजले त्यांची संख्या 32,500 भरली.
बिन्यामीनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
शफूफामपासून शूफामी कूळ;
आर्द आणि नामान यांच्याद्वारे बेलाचे वंशज हे होते:
ही बिन्यामीनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,600 भरली.
दानचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
ती सर्व शूहामी कुळे होती; आणि जे मोजले त्यांची संख्या 64,400 भरली.
आशेरचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
आणि बरीयाहच्या वंशजांपासून:
आशेरला सेराह नावाची कन्या होती.
ही आशेरची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 53,400 भरली.
नफतालीचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते:
येसेरपासून येसेरी कूळ;
ही नफतालीची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,400 भरली.
इस्राएली लोकांची एकूण संख्या 6,01,730 भरली.
याहवेहने मोशेला म्हटले,
“त्यांना नावाच्या संख्येनुसार देश वतन म्हणून द्यावा.
मोठ्या गटाला मोठा वारसा द्यावा आणि लहान गटाला लहान वारसा द्या; ज्यांची नावे यादीत आहेत त्यानुसार प्रत्येकाला संख्येनुसार त्यांचा वारसा मिळावा.
जमिनीची वाटणी चिठ्ठ्या टाकून होईल याची खात्री करावी. त्यांच्या पूर्वजांच्या गोत्राच्या नावानुसार प्रत्येक गटाला वारसा मिळावा.
प्रत्येक वारसा मोठ्या आणि लहान गटांमध्ये चिठ्ठ्याद्वारे वाटप केला जावा.”
ज्या लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार मोजणी झाली ते हे:
ही देखील लेवी लोकांची कुळे होती:
अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते, ती लेवी वंशातील होती, जी लेवीच्या घराण्यात इजिप्तमध्ये असताना जन्मली होती. अम्रामापासून तिने अहरोन, मोशे व त्यांची बहीण मिर्यामला जन्म दिला.
अहरोन नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार यांचा पिता होता.
परंतु नादाब आणि अबीहूने याहवेहसमोर अनाधिकृत अग्नीद्वारे अर्पण केल्यामुळे ते मरण पावले.
एक महिन्यापेक्षा अधिक वयाच्या लेवी पुरुषांची संख्या 23,000 भरली. इस्राएलच्या इतर लोकांमध्ये त्यांची मोजणी झाली नाही, कारण त्यांना त्यांच्यामध्ये वाटा मिळाला नाही.
मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशे व एलअज़ार याजकाने वरील इस्राएली लोकांची मोजणी केली.
सीनाय रानात मोशे आणि अहरोन याजकाने इस्राएली लोकांची जी मोजणी केली होती, त्यांच्यापैकी एकही या गणतीत नव्हता.
कारण याहवेहने त्या इस्राएली लोकांना सांगितले होते की ते खचितच रानात मरतील आणि यफुन्नेहचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशुआ यांच्याशिवाय एकही उरले नाही.