मग इय्योबाने उत्तर दिले:
JA
Copywork
Marathi OMRCV Job 23장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Job
“आज देखील माझे गार्हाणे कडू आहे;
परमेश्वर कुठे आढळेल हे जर मला माहीत असते;
तर माझा वाद मी त्यांच्यापुढे ठेवली असता
ते मला काय उत्तर देतील हे मी बघेन,
मोठ्या जोमाने ते माझा विरोध करतील काय?
सज्जन त्यांच्यासमोर आपली निर्दोषता सिद्ध करू शकतो,
“परंतु मी जर पूर्वेकडे गेलो तर परमेश्वर तिथे नाही;
जेव्हा ते उत्तरेकडे कार्यरत असतात, तरी मला ते दिसत नाहीत;
परंतु माझे मार्ग त्यांना अवगत आहेत;
माझ्या पावलांनी काळजीपूर्वक परमेश्वराच्या पावलांचे अनुसरण केले आहे;
मी त्यांच्या मुखातील आज्ञांपासून अलिप्त झालो नाही;
“परंतु ते अतुलनीय आहेत आणि त्यांचा विरोध करणारा कोण आहे?
माझ्याविरुद्ध असलेला त्यांचा निवाडा ते पूर्णतेस नेतील,
म्हणून त्यांच्या समक्षतेत मला भय वाटते;
परमेश्वराने माझे हृदय क्षीण केले आहे;
निबिड अंधकार माझे मुख झाकून टाकतो,