याहवेह तुम्ही माझे परमेश्वर आहात;
तुम्ही शहराला दगडविटांच्या तुकड्यांचा ढीग बनविले,
म्हणून बलवान लोक तुमचा सन्मान करतील;
तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात,
आणि वाळवंटातील उष्णतेसारखा.
या डोंगरावर सर्वशक्तिमान याहवेह
जे आच्छादन सर्व लोकांना आच्छादून टाकते,
सर्वकाळासाठी ते मृत्यूला गिळून टाकतील.
त्या दिवशी लोक असे म्हणतील,
याहवेहचा हात या पर्वतावर राहील;
जसे पोहणारे पोहण्यासाठी त्यांचे हात लांब करतात
ते तुमच्या तटबंदीच्या उंच भिंती खाली पाडतील