याहवेहचे स्तवन करा.
त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल;
संपत्ती व समृद्धी त्यांच्या घरात वास करतील,
सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो;
ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते,
निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही;
वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही;
यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत;
गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात,
दुष्ट मनाची माणसे हे सर्व पाहून क्रुद्ध होतील;