याहवेहचे स्तवन करा.
त्यांचे सर्व स्वर्गदूत, त्यांचे स्तवन करो;
सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा;
हे सर्वोच्च आकाशांनो,
त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो,
आणि त्यांनी त्यांची स्थापना सदासर्वकाळासाठी केली आहे—
पृथ्वीवर याहवेहचेच स्तवन होवो,
विजा व गारा, हिम व धुके,
अहो पर्वतांनो व सर्व टेकड्यांनो,
हिंस्र पशू आणि सर्व गुरे,
पृथ्वीवरील राजे व सर्व राष्ट्रे,
युवक व युवतींनो,
तुम्ही सर्व याहवेहचे स्तवन करा,
त्यांनी त्यांच्या लोकांचे शिंग उभारले आहे,