याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत,
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 136장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा,
प्रभूंच्या प्रभूचे आभार माना,
केवळ तेच असे महान चमत्कार करू शकतात,
ज्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने स्वर्गाची निर्मिती केली,
त्यांनी जलावर पृथ्वीचा विस्तार केला,
त्यांनी प्रचंड ज्योती निर्माण केल्या—
दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य,
रात्रीवरील प्रभुत्वासाठी चंद्र व तारे निर्माण केले;
त्यांनी इजिप्ती लोकांच्या प्रथम संतानास मारून टाकले,
त्यांनी इस्राएलास त्यांच्या तावडीतून सोडविले,
ज्यांनी आपल्या सशक्त हातांनी व विस्तारलेल्या भुजांनी त्यांना सोडविले,
तांबडा समुद्र दुभागला,
आणि इस्राएली लोकांना त्यामधून सुखरुपपणे पार नेले,
परंतु फारोह आणि त्याचे सैन्य तांबड्या समुद्रात बुडवून टाकले;
ज्यांनी आपल्या लोकांना अरण्यातून नेले,
ज्यांनी प्रबळ राजांचा नायनाट केला,
ज्यांनी प्रतापी राजांना ठार केले—
ज्यांनी अमोरी लोकांचा राजा सीहोन याला,
आणि बाशान प्रांताचा राजा ओग यालाही—
आणि त्यांची भूमी इस्राएलला कायमचे वतन म्हणून,
ज्यांनी आपला सेवक इस्राएल याला वारसा म्हणून दिली,
ज्यांनी आमच्या पराकाष्ठेच्या दुबळेपणात आमची आठवण केली,
आणि त्यांनी आम्हाला शत्रूपासून सोडविले,
ते सर्व प्राणिमात्राला अन्नपुरवठा करतात,
स्वर्गातील परमेश्वराचे उपकारस्मरण करा,