याहवेह राज्य करतात, सर्व पृथ्वी उल्हासित होवो;
मेघ व गडद अंधकार यांनी ते वेढलेले आहेत;
अग्नी त्यांच्यापुढे चालतो,
त्यांच्या विजा जगाला प्रकाश देतात;
याहवेहच्या उपस्थितीत, समस्त पृथ्वीचे सत्ताधीश
आकाश मंडल त्यांची नीतिमत्ता जाहीर करते;
जे प्रतिमांची प्रौढी मिरवित होते,
सीयोन ऐकते व उल्हासित होते,
कारण याहवेह तुम्हीच पृथ्वीवर परमश्रेष्ठ आहात;
याहवेहवर प्रीती करणारे वाईटाचा द्वेष करोत,
नीतिमानांवर प्रकाश उजळतो
सर्व नीतिमान, याहवेहच्या ठायी आनंद करा,